ताज्याघडामोडी

रेवदंडयात मनसेचा मराठी पाटयाचा आग्रह

रेवदंडयात मनसेचा मराठी पाटयाचा आग्रह
रेवदंडा-महेंद्र खैरे-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वत्र मराठी पाटया आंदोलन सुरू केले आहे, त्यानुसार रेवदंडा मनसेने सुध्दा रेवदंडयात मराठी पाटयाचा आग्रह धरला आहे.
रेवदंडा येथील मनसे अध्यक्ष प्रशांत वरसोलकर यांनी रेवदंडा शहरातील काही दुकानदारांनी मराठी पाटया लावल्या नसल्याने, रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्‍ल मोरे यांना मनसेच्या वतीने निवेदन पत्र देण्यात आले आहे.
रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत काही दुकानदार/आस्थापन मालक सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या 25 नोव्हेंबर 2023 पर्यंत मराठी पाटया लावण्याचे आदेशाचे पालन करत नसल्याचे निदर्शनास येते, 1961 दुकाने व आस्थापने कायदा नियम 20 अ अन्वये रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत दुकानदार मराठी पाटया लावणे बंधनकारक असताना दुर्लक्ष होत आहे. रेवदंडा शहरात सर्वोच्य न्यायालचाच्या मराठी पाटया लावण्याचे आदेशाचे उल्‍लघंन करणार्‍या दुकानदार/आस्थापने यांच्यावर रेवदंडा ग्रामपंचायतीने नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.
रेवदंडा शहर मनसे अध्यक्ष प्रशांत वरसोलकर यांचे प्रतिनिधी प्रथमेश बनिया यांनी हे निवेदन रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्‍ल मोरे यांना दिले. यावेळी उपसरपंच मंदाताई बळी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *