ताज्याघडामोडी

चौल ग्रामपंचायतीत आधार लिंक शिबीरास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद

चौल ग्रामपंचायतीत आधार लिंक शिबीरास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद
रेवदंडा-महेंद्र खैरे- चौल ग्रामपंचायतीत ग्रामस्थांच्या सुविधेसाठी भारत गॅस कार्ड धारकांना आधार लिंक जोडण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या आधार लिंक लाभार्थी ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद या शिबीरास दिला.
चौल ग्रामपंचायतीच्या सभागृहात या आधार लिंक शिबीराचे आयोजन भारत गॅस च्या कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने करण्यात आले होते. चौल ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमाने भारत गॅस कार्डधारक चौल ग्रामस्थांना अलिबाग येथे न जाता, चौल ग्रामपंचायतीच्या सभागृहा मध्ये आधार लिंक जोडून मिळाली त्यामुळे ग्रामस्थांचे वेळ, श्रम व पैसा या तिन्ही बाबींचा फायदा मिळाला.
सकाळी दहा वाजता या शिबिरास शिवसेना उध्दव ठाकरे गट जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सरपंच प्रतिभा पवार, उपसरपंच अजीत गुरव, ग्रा.प.सदस्या रूपाली म्हात्रे यांचे उपस्थितीत प्रारंभ झाला. सायकांळी पाच वाजेपर्यंत या शिबीराचा लाभ मोठया संख्येने चौल ग्रामस्थांनी भारत गॅस कार्ड धारकांनी आधार कार्ड लिंक करून घेतले.
चौल मधील लाभार्थी भारत गँस कार्डधारकांनी चौल ग्रामपंचायतीने राबविलेल्या स्तुत्य उपक्रमास विशेष धन्यवाद दिले. चौल ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग यांनी सुध्दा विशेष सहकार्य या उपक्रमास दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *