राज्य व केंद्र शासन मच्छीमाराचा पाठीशी – आम. रमेशदादा पाटील

रेवदंडयात भाजप मच्छीमार सेल व कोळी महासंघाचा जागतिक मच्छीमार दिन साजरा
राज्य व केंद्र शासन मच्छीमाराचा पाठीशी – आम. रमेशदादा पाटील

रेवदंडा-महेंद्र खैरे- राज्य व केंद्र शासन मच्छीमाराचा पाठीशी ठाम पणे उभे असून मच्छीमाराचे अनेक प्रश्न मार्गी लावले असल्याचे उदारहणासह सांगून, काम करणारे शासन असे अभिमानस्पद उद्गार विधान परिषद आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांनी रेवदंडा येथे भाजप मच्छीमार सेल व कोळी महासंघाचे विद्माने आयोजीत जागतिक मच्छीमार दिनाचे निमित्ताने आयोजीत कार्यक्रमास उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हटले.
रेवदंडा मोठबंदर जे.टी. नजीक भाजप मच्छीमार सेल व कोळी महासंघाचे विद्माने आयोजीत जागतिक मच्छीमार दिनाचे निमित्ताने निवारा शेड उद्धाटन सोहळा, तिवरा पुजन व नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच तसेच विविध सोसायटी चेअरमन यांच्या सत्कार कार्यक्रम गुरूवार विधान परिषद आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दि. 23 रोजी सायकांळी पाच वाजता घेण्यात आला. प्रसंगी आमदार रमेश पाटील यांचेसह शिवसेना शिंदे गट आम. महेंद्रशेठ दळवी, भाजप दक्षिण जिल्हा प्रमुख धैर्यशिल पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष्य दिलिपशेठ भोईर उर्फ थोटंमशेठ, माजी नगरसेवक प्रकाश बोबडी,भाजप माजी तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, भाजप तालुका अध्यक्ष उदय काठे, माजी मुरूड भाजप तालुका अध्यक्ष जयवंत अंबाजी, राजहंस टपके, देवानंद भोईर गोरखनाथ नवरीकर, ताराचंद कोंडे, रेवदंडा ग्रा.प.सरपंच प्रफुल्ल मोरे, उपसरपंच मंदाताई बळी, तसेच नवनिर्वाचीत सरपंच, उपसरपंच आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन भाजप मच्छीमार सेल महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अँड चेतन पाटील, सहसंयोजक संतोष पाटील, पांडुरंग चौवले यांनी केले होते.सुरूवातीस आमदार रमेशदादा पाटील यांची वाजतगाजत बेंजो पथकासह कार्यक्रम स्थळापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आमदार रमेशदादा पाटील व अन्य मान्यवरांचे हस्ते तिवरा पुजन करण्यात आले, तसेच आमदार रमेशदादा पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या रेवदंडा जे.टी. निवारा शेडच्या श्रीफळ वाढवून व फित कापून शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर मान्यवर उपस्थितांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी भाजप मच्छीमार सेलचे राज्य अध्यक्ष अॅड. चेतन रमेश पाटील यांनी प्रास्ताविकेत मच्छीमार दिन का साजरा केला जातो ? यांचे स्पष्टीकरण केले. मच्छीमार दिनाचे माध्यमातून मच्छीमारांच्या अडचणी, तसेच प्रदुषण आदी प्रश्न शासन दरबारी पोहवू शकतो असे सांगून मच्छीमाराचा विकास व्हायला पाहिजे, शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे तसेच एलएडीने मच्छीमारांवर संकट उभे ठाकले असून मच्छीमाराचा दुष्काळ जाहीर करा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी कोळी बांधवाना बिच टेंटच्या माध्यमातून जोड धंदयाची सुविधा दयावी असेही म्हटले. भाजप दक्षिण जिल्हा अध्यक्ष धैर्यशिल पाटील यांनी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना लोकांपर्यत पोहचविण्याचे कार्य भाजप कार्यकर्त्यानी केले पाहिजे हे सांगतानाच राहिल त्याचे घर या प्रमाणे प्रत्येक कोळीवाडयातील समुद्र लगतचे जागाचे अंसेसमेंट पक्के करावे असे आवाहन त्यांनी केले. तर माजी नगरसेवक प्रकाश बोंबडी यांनी मच्छीमाराचे विविध प्रश्न मांडले. भाजप उपजिल्हा प्रमुख व माजी समाज कल्याण सभापती दिलिप भोईर उर्फ थोटंम शेठ यांनी भाजप हा लोकशाही जपणारा पक्ष असून राज्य व केेंद्र शासन लोकहितासाठी काम करत असल्याचे सांगूल भाजप प्रामाणिक व कार्यप्रणालीने काम करत असून प्रत्येक योजना घराघरात पोहचविण्याचे काम करते असे म्हटले. तर आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी कोळी व आगरी ॠणाबंधाचे नाते असून कोळी समाजाचे दाखले प्रवाहीत व्हावे यासाठी निश्चित प्रयत्नशील असल्याचे सागितले. यावेळी मच्छीमाराचे विविध प्रश्न विधानसभेत मांडण्याची ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली. तर कोळी समाजाची उन्नती व परिवर्तन व्हायलाच पाहिजे असू सांगून राज्य व केंद्र शासन मच्छीमाराचा पाठीशी ठाम पणे उभे असून मच्छीमाराचे अनेक प्रश्न मार्गी लावले असल्याचे उदारहणासह सांगून, काम करणारे शासन असे अभिमानस्पद उद्गार विधान परिषद आमदार व कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांनी काढले.
कार्यक्रमाचे शेवटी उपस्थितांच्या समस्याचे निवेदन आमदार रमेश पाटील यांनी स्विकारले, तसेच आयुष्यमान योजनेेचे कार्ड वाटप आमदार महेंद्रशेठ दळवी व आमदार रमेशदादा पाटील यांचे हस्ते करण्यात आले. तत्पुर्वी अनेक मान्यवर मंडळी व संस्थाचे वतीने आमदार महेंद्रशेठ दळवी व आमदार रमेशदादा पाटील यांना पुष्पगूच्छ प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री मढवी व संतोष पाटील यांनी केले.