ताज्याघडामोडी

उपसरपंचपदी मंदाताई बळी यांचा विजय

रेवदंडा ग्रा.प. सरपंच प्रफुल्‍लशेठ मोरे यांनी पदभार स्विकारला
उपसरपंचपदी मंदाताई बळी यांचा विज

रेवदंडा-महेंद्र खैरे- रेवदंडा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत सरपंच पदाच्या थेट निवडणूकीत विजयी झालेले रेवदंडा विकास आघाडीचे प्रफुल्‍लशेठ मोरे यांनी पदभार स्विकारला, तर त्याचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत रेवदंडा विकास आघाडीच्या मंदाताई बळी यांनी विजय हासिल केला.
अलिबाग तालुक्यात प्रतिष्ठेची असलेल्या रेवदंडा ग्रुप ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीत शिवसेना शिंदे गट, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कृत रेवदंडा विकास आघाडीचे प्रफुल्‍लशेठ मोरे यांनी सरपंचपदाच्या थेट निवडणूकीत भरघोस मताधिक्याने विजय मिळविला होता. तर रेवदंडा ग्रामपंचायत सभागृहात संपन्न झालेल्या उपसरपंच निवडणूकीत शेकापक्षाचे संतोष मोरे यांचा निसटता पराभव करून रेवदंडा विकास आघाडीच्या मंदाताई बळी यांनी विजय हासिल केला. यावेळी रेवदंडा विकास आघाडीच्या कार्यकर्त्यानी फटाक्याची आतषबाजीने जल्‍लोष केला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अ‍ॅड महेश मोहिते यांनी उपसरपंच निवडणुकीत उपस्थित राहून रेवदंडा विकास आघाडीस मोलाचे सहकार्य दिले. रेवदंडा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचीत सरपंच प्रफुल्‍लशेठ मोरे शिवसेना शिंदे गटाचे तालुका संघटक म्हणून कार्यरत आहेत. तर नवनिर्वाचीत उपसरपंच मंदाताई बळी या थेरोंडा विभागातील भाजपच्या कार्यकर्त्या आहेत.
रेवदंडा ग्रामपंचायतीत रेवदंडा नवनिर्वाचीत सरपंच प्रफुल्‍लशेठ मोरे, उपसरपंच मंदाताई बळी यांचेसह ग्रामपंचायत सदस्य दुशांत झावरे, सदस्या आशा नारायण कमळनाथ, सदस्या रंजना नरेश उमटे, सदस्या माधवी रविंद्र चौलकर, सदस्या दिक्षा अजीत बळी, सदस्य सुराराम मोहनलाल माळी, सदस्या बबिता संदिप खंडेराव, सदस्य राजेंद्रकुमार वाडकर, मनिषा मिलिंद चुनेकर, प्रिती आशिष गोंधळी, संतोष सदाशिव मोरे, स्नेहल शेखर बळी, लिना किशोर मानकर, खलिल युनूस तांडेल,जयश्री अजीत जायपाटील आदीने उपसरपंच निवडणुकीत सहभाग घेतला.
यावेळी रेवदंडा विकास आघाडीचे शिवसेना शिंदे गट, भाजप व राष्ट़्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेकापक्ष कार्यकर्ते यांची उपस्थिती मोठया संख्येने होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *