ताज्याघडामोडी

उपसरपंचपदी निलेश गायकर यांची निवड

खानाव ग्रा.प. सरपंच अजय नाईक यांनी पदभार स्विकारला
उपसरपंचपदी निलेश गायकर यांची निवड

रेवदंडा-महेंद्र खैरे- अलिबाग तालुक्यात लक्ष्यवेधी ठरलेल्या खानाव ग्रामपंचायतीत खानाव ग्रामविकास परिवर्तन पॅनेलचे सरपंच अजय नाईक यांनी पदभार स्विकारला असून उपसरपंचपदी निलेश गायकर यांची निवड झाली.
खानाव ग्रुप ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत मुख्यः प्रर्वतक निलेश गायकर यांच्या नेतृत्वाखाली खानाव ग्रामविकास परिवर्तन पॅनेलने निवडणुक लढविली होती. या निवडणुकीत अजय नाईक यांनी थेट सरपंचपदी विजय मिळविला होता. खानाव ग्रुपग्रामपंचायत निवडणुकीतील निकाल संपुर्ण अलिबाग तालुक्यात लक्ष्यवेधी ठरला, कारण अनेक वर्षे खानाव ग्रामपंचायतीत एकहाती सत्‍ता राखणारे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांनी अबाधीत सत्‍ता राखली होती. परंतू न भुतो न भविष्य व आजपर्यंत कोणत्याही पक्षाला शक्य झाली नसलेली ग्रामपंचायत खानाव निवडणुक उसर प्रकल्पग्रस्तांचे नेते निलेश गायकर यांनी खानाव ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या माध्यमातून शिवसेना तालुका प्रमुख अनंत गोंधळी यांची सत्‍ता उलथवून टाकीत ऐतिहासिक विजय हासिल केला.
खानाव ग्रामपंचायतीत नवनिर्वाचीत सरपंचपदाचे थेट विजयी सरपंच अजय नाईक यांनी पदभार स्विकारला व त्यांचेेच अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली यामध्ये निलेश गायकर यांची उपसरपंचपदावर निवड झाली. यावेळी खानाव ग्रामविकास परिवर्तन पॅनेलच्या कार्यकर्त्यानी फटाक्याची आतषबाजी करून जल्‍लोष केला. खानाव ग्रामपंचायतीत सरपंच अजय नाईक, उपसरपंच निलेश गायकर, निधी नयन पाटील, विशाखा विजय गायकर, सज्जला संदेश शिंदे, संदेश पडवळ, मनिषा महेंद्र म्हात्रे, उक्‍ता योगेश गुजर, सुचिता सतिश म्हात्रे, अनिकेत दत्रात्रेय नाईक,हे खानाव ग्रामविकास परिवर्तन पॅनेल सदस्य आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *