ताज्याघडामोडी

साळाव ग्रामपंचायत सरपंचपदी वैभव कांबळी व उपसरपंचपदी दिनेश बापळेकर

साळाव ग्रामपंचायत सरपंचपदी वैभव कांबळी व उपसरपंचपदी दिनेश बापळेकर
रेवदंडा-महेंद्र खैरे- मुरूड तालुक्याचे लक्ष्य वेधून घेतलेल्या साळाव ग्रामपंचायत सरपंचपदी भाजपचे वैभव कांबळी यांनी थेट सरपंचपदी निवड झाली होती, त्यांनी सरपंचपदाचा पदभार स्विकारला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनेश बापळेकर यांनी उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली..
साळाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप, उध्दव ठाकरे गट शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या परिवर्तनाची ग्रामविकास आघाडीतून वैभव कांबळी अनंत कांबळी थेट सरपंचपदी निवडून आले होते, त्यांनी साळाव ग्रामपंचायतीत पदभार स्विकारला, यावेळी सरपंच वैभव कांबळी यांचे अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडणुक घेण्यात आली, यामध्ये परिवर्तन ग्रामविकास आघाडीचे वतीने दिनेश बापळेकर यांच्या ऐकमेव अर्ज उपसरपंचपदासाठी आला होता, त्यामुळे त्यांना साळाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी बिनविरोध विजयी घोषीत करण्यात आले.
साळाव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात भव्य सत्कार कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता, यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलिपशेठ भोईर यांच्यासह तालुका अध्यक्ष चौलकर तसेच साळाव जेष्ठ कार्यकर्ते सुरेश म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व उध्दव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनाचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे उपस्थित होते. यावेळी मोठया संख्येने साळाव ग्रामस्थांची उपस्थिती होती.
साळाव ग्रामपंचायत सरपंचपदी वैभव अनंत कांबळी, उपसरपंच दिनेश दामू बापलेकर, सदस्य पप्पू धर्मा जंगम, सदस्य दत्‍ता गोमा पाटील, सदस्य शितल कमळाकर वाणी, सदस्य चंदु महादेव पाटील, सदसय अंकिता संजय कांबळी, सदस्य चंद्रकला चंद्रकांत पाटील, सदस्य मंजुळा बबन वाघमारे, सदस्य समरीन सुरेल कासकर हे निवडून गेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *