ताज्याघडामोडी

नागाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी पदभार स्विकारलाउपसरपंचपदी सुरेंद्र नागलेकर यांची निवड

नागाव ग्रुप ग्रामपंचायत सरपंच हर्षदा निखिल मयेकर यांनी पदभार स्विकारला
उपसरपंचपदी सुरेंद्र नागलेकर यांची निवड

रेवदंडा-महेंद्र खैरे- अलिबाग तालुक्यात सर्वाधिक रेकॉडब्रेक मताचे आघाडीने नागाव ग्रामपंचायतीवर थेट सरपंचपदी निवडून गेलेल्या हर्षदा निखिल मयेकर यांनी पदभार स्विकारला तर उपसरपंचपदी सुरेंद्र नागलेकर यांची बिनविरोध निवउ करण्यात आली.
अलिबाग तालुक्यात नागाव ग्रामपंचायतीत दोन हजार मताधिक्याने हर्षदा निखिल मयेकर या थेट सरपंचपदी निवडून आल्या होत्या, या लोकप्रिय सरपंच हर्षदा मयेकर यांच्या पदग्रहण कार्यक्रम व उपसरपंचपदाची निवड कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नागाव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात सत्कार कार्यक्रम व सरपंच हर्षदा मयेकर यांचे नागाव ग्रामस्थांशी मनोगत व्यक्‍त करण्याचा कार्यक्रम झाला. त्यानिमित्‍त उपस्थितांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
नागाव ग्रामपंचायतीच्या प्रांगणात झालेल्या सत्कार व अभिनंदन कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य व्दारकानाथ नाईक, शेकापक्षाचे तालुका चिटणीस अनिल पाटील, नागाव ग्रा.प. माजी सरपंच नंदुशेठ मयेकर, आदी मान्यवर मंडळीची उपस्थिती व्यासपिठावर होती. तसेच सरपंच हर्षदा मयेकर, नवनिर्वाचीत उपसरपंच सुरेंद्र नागलेकर, सदस्या प्रियंका काठे, सदस्या निकिता पाडेकर, सदस्य अनिरूध्द राणे, सदस्या रोहिणी घरत, सदस्या विणा विकास पिंपळे, सदस्या मंगळा रविंद्र नागे, सदस्य आदेश आंबाजी मोरे, सदस्या लिना दिलिप म्हात्रे, सदस्य निखिल नंदकुमार मयेकर, सदस्या सुप्रिया संजय म्हात्रे, सदस्य परेश एकनाथ ठाकूर, सदस्य सुरज चंद्रकांत म्हात्रे, सदस्य रोहन रामचंद्र नाईक, सदसया अंकिता चेतन शेवडे यांची सुध्दा उपस्थिती होती.
नागाव ग्रामपंचायतीत मतदारांनी दाखविलेल्या विश्‍वासास तडा जाऊ देणार नाही, तसेच नागावच्या सर्वागिण विकासासाठी तत्पर राहून नागावचे नाव जागतिक पातळीवर पोहचविण्याचा निश्‍चित प्रयत्नशील राहणार आहे, असे मनोगत व्यक्‍त करतानाच सरपंच हर्षदा मयेकर यांनी नागाव ग्रामपंचायतीत सरपंचपदासाठी महिलासाठी संधी उपलब्ध झाली, महिलाचा सक्षमीकरणासाठी सर्व महिलांनी एकत्रीत काम करू या असे आवाहन ग्रामस्थ महिलांना केले. यावेळी उपसरपंच सुरेंद्र नागलेकर यांनी सुध्दा उपसरपंचपदी निवडीचे आभार व्यक्‍त करून नागाव मध्ये क्रियाशीलतेने काम करण्याची ग्वाही उपस्थितांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *