ताज्याघडामोडी

चौल येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर

चौल येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर
रेवदंडा-महेंद्र खैरे- अलिबाग तालुक्यातील चौल येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच संपन्न झाले. या नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास गरजूंचा मोठा प्रतिसाद लाभला.
चौल चंपावती मंदिरात श्री सत्यसाई संघटना मुंबई मेट्रो प्रदेश महाराष्ट्र आणि आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल, नवीन पनवेल यांचे विदयमाने शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मोफत नेत्र व मोतिबिंदू श्रस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले.
चौल येथे श्री सत्यसाई संघटना, मुुंबई मेट्रो प्रदेश यांचे विविध खेडेगावात 14 वेळा सलग नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहे.या शिबीरामये एकूण 130 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली, यामध्ये वीस जणांना मोतिंबिंदू शस्त्रक्रियेसाठी रूग्ण मिळाले आहेत. यामध्ये एकूण 1600 पेक्षा जास्त रूग्णाची डोळे तपासणी व 300 पेक्षा जास्त रूग्णांचे मोतिबिंदू ऑपरेेशन करण्यात आले अशी माहिती श्री सत्यसाई संघटनेचे सुरेश मेहेर यांनी दिली.
या मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदु तपासणी शिबीरास श्री सत्यसाई संघटनेचे पदाधिकारी व सेवक यांचेसह चंपावती मित्रमंडळाचे जितेश नागवेकर, रविंद्र महाले, ॠग्वेद जोशी, जयवंत नागवेकर, सिध्देश जाधव, मनोज नाईक, मधुकर सावंत, संदिप घरत यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *