पदवीधरांना निवडणुक मतदार ओळखपत्र मिळावी- जयपाल पाटील

पदवीधरांना निवडणुक मतदार ओळखपत्र मिळावी- जयपाल पाटील
रेवदंडा-महेंद्र खैरे- दरवर्षी नव्याने नोंदणी करण्यापेक्षा शासकीय निवडणूक ओळखपत्र मतदार करण्यासाठी एकदाच मिळावे अशी मागणी रायगड भुषण पत्रकार व आपत्ती तज्ञ जयपाल पाटील यांनी मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.
जयपाल पाटील यांनी मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लवकरच कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक होत आहे. मागील पदवीधर निवडणूकीत पदवीधरांनी शासकीय नियमानुसार सर्व कागदपत्रांची पुर्तता करून नोंदणी केली होती व त्यानुसार मतदानही केले होते. लवकरच कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी पदवीधरांनी नोंदणी तहसिल विभागातील निवडणूक विभागाकडे करावी असे शासकीय पत्रक वाचनात आले. त्याकरीता आता सर्व कागदपत्रांची झेरॉक्ससाठी पंचवीस रूपये खर्च अपेक्षीत असून प्रत्येकाला तो खर्च करावा लागणार आहे. मात्र खर्चाचा भुर्दड नाहक होत असल्याने काही गरज व जरूरी मतदानाची नसल्याचे मतदार मत व्यक्त करत असून त्यामुळे नोंदणी कमी होत असते व पदवीधर मतदानास जात नाहीत.
पदवीधर म्हणून तहसिल कार्यालयात सर्व कागदपत्रांसहीत नोंदणी केली होती व मागील यादीत नाव असल्याने मतदानही केले होते. प्रत्येकवेळी नव्याने नोंदणी करण्याऐवजी प्रत्येक पदवीधरांस शासनाचे निवडणूक ओळखपत्र दिले जाते, तसेच ओळखपत्र पदवीधर एकदाच दिले जावे, अशी मागणी रायगड भुषण पत्रकार व आपत्ती तज्ञ जयपाल पाटील यांनी मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.