ताज्याघडामोडी

नागाव मध्ये प्रोजेक्ट दृष्टी अभियानास मोठा प्रतिसाद

नागाव मध्ये प्रोजेक्ट दृष्टी अभियानास मोठा प्रतिसाद
मोफत डोळे तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप

रेवदंडा-महेंद्र खैरे- नागाव मध्ये प्रोजेक्ट दृष्टी अभियानास मोठा प्रतिसाद लाभला, या अभियाना अंतर्गत मोफत डोळे तपासणी, मोतिबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप कार्यक्रम 2 ऑक्टोबर रोजी नागाव ग्रामपंचायत सभागृह, बागमळा मराठी शाळा व पाल्हे विठ्ठल मंदिर येथे राबविण्यात आला.
शेकापक्ष महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून मोफत चष्मे वाटप, लायन्स क्‍लब ऑफ अलिबाग-नागाव वतीने मोतिबिंद्र विषयक शस्त्रक्रिया व मार्गदर्शन, डॉक्टर वर्षा मकरंद नाईक यांचे वतीने डोळयांची तपासणी व नंबर काढणे, व निखिल मयेकर मित्रमंडळाचे वतीने नेत्रदान श्रेष्ठदान संकल्प आदी कार्यक्रम प्रोजेक्ट दृष्टी कार्यक्रम अंतर्गत नागाव ग्रामपंचायत सभागृहात सकाळी नऊ ते दोन, बागमळा मराठी शाळा दुपारी तिन ते सायकांळी पाच, व पाल्हे विठ्ठल मंदिर सायकांळी चार ते सहा दरम्यान राबविण्यात आला. या कार्यक्रमास गरजूंनी मोठा प्रतिसाद दिला, व एकूण 250 जणांनी या अभियाना अंतर्गत लाभ घेतला.
नागाव ग्रामपंचायत कार्यालयात नागाव ग्रा.प. माजी सरपंच नंदुशेठ मयेकर, अलिबाग-नागाव लायन्स क्‍लब अध्यक्ष प्रकाश गुरव, माजी सरपंच निखिल मयेकर, माजी ग्रा.प.सदस्य राजेंद्र मयेकर, नांदळेकर, डॉ. वर्षा मकरंद नाईक, माजी नागाव ग्रा.प.सदस्या हर्षदा मयेकर, सचिन राऊळ व नागाव जेष्ठ नागरिक आदी मान्यवरांचे उपस्थीतीत कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थितांचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. तर या स्तुत्य उपक्रमात सहभाग झाल्याचा आनंद अलिबाग-नागाव लायन्स क्‍लब अध्यक्ष प्रकाश गुरव यांनी मनोगत व्यक्‍त करताना केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हर्षदा मयेकर यांनी केले. या प्रोजेक्ट दृष्टी अभियानास शेकापक्ष महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली, त्याचे स्वागत राजेंद्र मयेकर यांनी पुष्पगूच्छ प्रदान करून केले.
या अभियानात लायन्स हेल्थ अलिबाग यांचे वतीने डॉक्टर शुभदा कुमठेकर, डॉक्टर स्वेता दोही, ॠतुजा बेडेकर, सुजित पाटील, शमिका फडके, धनश्री थळे यांनी तर श्री नेत्र आय क्‍लिनिक नागाव यांचे वतीने डॉ. वर्षा मकरंद नाईक, मृदला राणे, व सध्या प्रसाद यांचे सहकार्य लाभले. तसेच शेकापक्ष महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची संकल्पना व योगदान प्रोजेक्ट दृष्टी अभियानास होती, यावेळी सिएफटीआयचे वतीने राहील कडू, नितिन जानकर, विनायक चौगले, रितेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *