काकळघर ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचे भुमिपुजन
काकळघर ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांचे भुमिपुजन
रेवदंडा-महेंद्र खैरे- मुरूड तालुक्यातील काकळघर ग्रामपंचायत हद्दीतील गावात विविध विकासकामांचे भुमिपुजन नुकतेच संपन्न झाले.
काकळघर ग्रामपंचायत हद्दीतील डाकेली येथे सिमेंट कॉक्रिटीकरण रस्ता पारगाण येथे सिमेंट कॉक्रिटीकरण रस्ता व तसेच सरक्षंण भिंतीचे भुमिपुजन कार्यक्रम दि. 28 सप्टेबर रोजी आयोजीत करण्यात आले होते. या प्रसंगी काकळघर ग्रामपंचायत शिंदे गट शिवसेना सरपंच स्वस्तिक ठाकुर, जेष्ठ नेते सि.एम. ठाकूर, मुरूड तालुका कुणबी समाज अध्यक्ष सुरेश ठाकूर, पारगाण ग्रामस्थ व महिला यांची उपस्थिती होती. काकळघर ग्रामपंचायत हद्दीत डाकेली कॉक्रिटीकरण रस्ता, पारगाण कॉक्रिटीकरण रस्ता तसेच सरंक्षण भिंतीचे काम आम. महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रयन्तातून होत असून जेष्ठ नेते सि.एम. ठाकूर यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
यावेळी डाकेली कॉक्रिटकरण रस्ता, पारगाण कॉक्रिटकरण रस्ता व पारगाण सरंक्षण भिंत या कामाचे भुमिपुजन काकळघर ग्रामपंचायत सरपंच स्वस्तिक ठाकूर यांचे हस्ते करण्यात आले यावेळी येथील ग्रामस्थ व महिलावर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.