ताज्याघडामोडी

चौलनाका खड्डे मुक्‍त केव्हा होणार ? प्रवासीवर्गाची भावनिक साद ..

प्रतिवर्षी पावसाळयांत खड्डेच खड्डेे व पाण्याची डबकी
चौलनाका खड्डे मुक्‍त केव्हा होणार ? प्रवासीवर्गाची भावनिक साद .
.
रेवदंडा-महेंद्र खैरे- प्रतिवर्षी ऐन पावसाळयांत चौल नाक्यावर खड्डेच खड्डे पडून पाण्याची मोठी डबकी तयार झालेले चित्र दिसते, चौलनाका खड्डेमुक्‍त केव्हा होणार अशी भावनिक साद येथून जा-ये करणारा प्रवासीवर्ग व ग्र्रामस्थ घालीत आहेत.
ऐतिहासिक चंपावतीनगरी म्हणून ओळख असलेले चौल आजमितीस सुध्दा येथील प्राचीन व जागृत मंदिरे तसेच नारळ-सुपारी बागायतीचे गाव, रोहा, मुरूड व अलिबाग या तिन तालुक्याला मध्यवर्ती असलेले ठिकाण आहे. चौल गावाचे वैभव चौल नाका आहे, चौलच्या सामाजीक, राजकीय व इतर घडामोडीचे पडसाद हमखास चौल नाक्यावर उमटतात. परंतू गेले कित्येक वर्ष ऐन पावसाळयात चौल नाक्यावरून मार्गस्थ होताना, खड्डेच खड्डे व पाण्याची डबकी हे चित्र दिसते. चौल नाक्यावर ऐन पावसाळयात रस्त्याची एव्हढी दुरावस्था होते, या खड्डात पावसाचे पाणी साचून मोठ मोठी डबकी तयार झाली आहेत, की वाहनासह पायी चालत जाताना सुध्दा खड्डातून रस्ता शोधावा लागतो.
चौल नाका हे अलिबाग, मुरूड व रोहा या तिन तालुक्याना जोडणारा मध्यवर्ती ठिकाण आहे, विशेषतः अलिबाग ते मुरूड व मुरूड ते अलिबाग यासाठी नित्याचा रहदारीचा रस्ता, या रस्ताने अहोरात्र वाहने सुरू असतात, गेले अनेक वर्ष चौल नाक्यावर ऐन पावसाळयात मोठे मोठे खड्डे तयार होतात, त्यामुळे चौलनाक्यावर रस्त्याच्या दयनीय अवस्थेने प्रवासीवर्ग व लहान मोठी वाहने यांना खुपच त्रासदायक ठरते. अनेक वर्षे गणेशौत्सवात सुध्दा श्री गणेशाला या खड्डातून व मोठया डबक्यातून मार्गस्थ व्हावे लागते, संबधीत मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेकडे केव्हाही आस्थेने पहात नाही, यांची खंत चौल ग्रामस्थांची आहे.
चौल नाक्यावर पावसाळयातील खड्डे पासून सुटका व्हावी म्हणून संबधीतानी येथे पेव्हर ब्लॉक बसविले, परंतू कामाचे नियोजन व दुरदृष्टीचा अभाव यामुळे मुख्य रस्त्यावर पाण्याची डबकी होतच राहिली, या रस्ताला पेव्हर ब्लॉक बसवून सुध्दा प्रथम पाण्याची डबकी व नंतर खड्डेच खड्डे झालेले दिसून येतात. वास्तविक चौल नाक्यावर मुख्यः प्रश्‍न आहे तो, पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य रितीने होत नाही, पावसाळयात पाण्याचा निचरा होत नसल्याने चौल नाक्यावर तुडूंब पाणी साचते व या साचलेल्या पाण्याने खड्डे व पाण्याची डबकी तयार झालेली दिसतात.
प्रतिवर्षी पावसाळयात चौल नाक्यावरील रस्ताची दुरावस्था कधी दुर होणार, खडडे व पाण्याच्या डबक्यातून मार्गस्थ होत असलेले प्रवासीवर्ग, वाहन चालक व ग्रामस्थ चौल नाका खड्डे मुक्‍त केव्हा होईल ? अशी भावनिक साद घालीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *