रेवदंडा को-ऑप अर्बन बँकेची 94 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

रेवदंडा को-ऑप अर्बन बँकेची 94 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
रेवदंडा-महेंद्र खैरे- दि. रेवदंडा को-ऑप अर्बन बँक लि. रेवदंडा ची 94 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठया उत्साहात संपन्न झाली.
दि. रेवदंडा को-ऑप. अर्बन बँकेचे चेअरमन प्रभाकर धर्मा नाईक यांचे अध्यक्षतेखाली शनिवार दि. 9 सप्टेबर रोजी रेवदंडा मुख्य शाखेच्या सभागृहात दुपारी तिन वाजता घेण्यात आली. यावेळी चेअरमन प्रभाकर धर्मा नाईक यांचेसह व्हाईस चेअरमन धरती निलेश राऊत,संचालक वामन काशिनाथ घरत, संचालक नजमुस्साकिब म.अ. लांबाते, संचालक जाकीर अली हमदुले, संचालक सतिश नारायण लेले, संचालिका आरती अशोक मढवी, संचालक गजाना रामदास झेडेंकर, संचालक अंजनकुमार बाळकृष्ण तांबडकर, संचालक अरूण शंकर म्हात्रे, संचालक महेंद्र वसंत पाटील, संचालक मंगेश शंकर परभाळे, संचालक निलेश नारायण गाडे,तज्ञ संचालक शादाब महमद रफिक काटे, तसेच व्यवस्थापकीय संचालक मंडळ सुनिल पद्माकर अग्नीहोत्री, शर्मिला सौरभ दिवेकर, अरूण शंकर म्हात्रे, नजमुस्साकिब म.अ. लांबाते तसेच बॅकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मोहमद अली अ.स.हाजते, व्यवस्थापक दिनेश माळी, व इतर अर्बन कर्मचारीवर्ग आदीसह मोठया संख्येने सभासदाची उपस्थिती होती.
या सभेत दि. 24 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्तात वाचून मंजूर करणे, सन 2022-2023 सालच्या संचालक मंडळाचाअहवाल, ताळेबंद, व नफातोटा पत्रक, तसेच नफा वाटणी, यांस मान्यता देणे, वैधानिक हिशोब तपासणीसांचा सन 2022-2023 सालच्या अहवालाची नोंद घेणे, सन 2021-2022 च्या वैधानिक लेखा परिक्षणाचा दोष दुरूस्ती अहवालाची नोंद घेणे, संचालक मंडळानी सुचविलेल्या सन 2023-24 च्या अदांजपत्रकांस मंजुरी देणे, रिझर्व बँकेच्या परिपत्रकाप्रमाणे सन 2023-24 करीता वैधानिक लेखा परिक्षकांच्या पुर्ननियुक्ती प्रस्ताव रिझर्व्ह बँकेकडे मान्यतेकरीता सादर केलेला आहे त्यांची नोंद घेणे, वार्षिक सर्वसाधारण सभेत गैरहजर असलेल्या सभासदाची अनुउपस्थीती क्षमापित करणे, संचालक मंडळ ठेवील अशा कामाचा विचार करणे, व अध्यक्षाच्या परवानगीने आयत्या वेळेस सभेपुढे आलेल्या विषयांची चर्चा,विचार करणे आदी विषय घेण्यात आले.