चौलच्या श्री सद्गुरू पतसंस्थेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

चौलच्या श्री सद्गुरू पतसंस्थेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
रेवदंडा-महेंद्र खैरे- चौल नाका येथील श्री सद्गुरू ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.
श्री सद्गुरू पतसंस्थेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभात शुक्रवार दि. 8 सप्टेबर रोजी कार्यालयीन सभागृहात दुपारी 2.30 वाजता पतसंस्थेचे अध्यक्ष प्रविण राऊत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रविण राऊत यांचेसह पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर म्हात्रे, सेके्रटरी असिफ किरकिरे, ख्जिनदार प्रतिक्षा राऊत, संचालक प्रथमेश राऊत, संचालक शुभांगी पाटील, संचालक विश्वनाथ म्हात्रे, संचालिका ज्योती म्हात्रे, संचालिका योगिता नाईक, संचालक प्रविण बाजी, व्यवस्थापक महेंद्र नाईक, उपव्यवस्थापक निलेश राऊत आदीसह मोठया संख्येने पतसंस्थेचे सभासद उपस्थित होते. सभेचे सुत्रसंलचन व प्रास्ताविक पतसंस्थेचे सेक्रेटरी असिफ किरकिरे यांनी केले.
या सभेत मागील सभेचे इतिवृत्तात वाचून मंजूर करणे, दि. 31/02/2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाच्या अहवाल वाचून मंजूर करणे, दि. 31/03/2023 रोजीच्या तेरीज, नफातोटा व ताळेबंद पत्रक मंजूर करून नफा वाटणी मंजूर करणेबाबत. शासकीय हिशोब तपासणीकांच्या सन 2022 -2023 या आर्थिक् वर्षाच्या अहवालाची नोंद घेणे व स्विकृत करणे. सन 2022-2023 सालाकरीता वैधानिक लेखा परिक्षकांच्या संचालक मंडळाने केलेल्या नेमणुकीस व त्यांच्या मानधनास कार्योत्तर मंजूरी देणे. मागील लगतच्या वर्षाच्या लेखा परिक्षण अहवालाच्या दोष दुरूस्ती अहवाल सादर करणे, व त्यास मंजूरी देणे. सन 2023-2024 च्या अंदाजपत्रकांस मंजुरी देणे, आदी विषय घेण्यात आले.
या सभेत सभासदासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या, पुणे येथील प्राध्यापक एस.बी. वाटाणे यांनी सभासदांना ठेवी, बचत, कर्ज सभासदाची कर्तव्ये,जबाबदारी, व अधिकार यांची माहिती व तसेच विविध विषयावर प्रशिक्षण दिले. तसेच पतसंस्थेेच अध्यक्ष प्रविण राऊत व संचालक मंडळ यांचे हस्ते जेष्ठ नागरिक, दहावी व बारावी मधील गुणवंत विदयार्थी सत्कार, तसेच मान्यवर सभासदाचा सत्कार शाल,श्रीफळ व भेटवस्तू प्रदान करून करण्यात आला.
सभासदानी भागभाडवळात वाढ करून पतसंस्थेचे भागभाडवळ वाढविण्यात मदत करावी, तसेच कर्जदारांनी आपली नियमित फेड करावी असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष प्रविण राऊत यांनी सभासदाना मार्गदर्शन करताना केले.