रेवदंडयातील सुमित्र पतसंस्थेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
रेवदर्ंडा-महेंद्र खैरे-रेवदंडयातील सुमित्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच उत्साहात संपन्न झाली.
सुमित्र पतसंस्थेचे कमळाकर साखळे यांचे अध्यक्षतेखाली रविवार दि. 10 सप्टेबर रोजी सायकांळी चार वाजता मोठे बंदर भंडारी समाज सभागृहात रेवदंउयातील सुमित्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची 27 वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष कमळाकर साखळे यांचेसह उपाध्यक्ष खलिल तांडेल, संचालक महेंद्र नाईक, संचालक उमेश कोंडे, संचालक राजेंद्र सदाशिव वाडकर, संचालक अशोक जाया हवालदार, संचालक विजय सखाराम चौलकर, संचालक सदानंद शंकर घरत, संचालिका प्रतिभा शरद वरसोलकर, संचालिका कमरजब्बीन मुज्जफर मुकादम, तज्ञ संचालक सलिम अब्बास तांडेल, तज्ञ संचालिका मालती मधुकर ठाकूर, व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक हरी नागावकर, व्यवस्थापक क्रांती जाधव, रोखपाल नरेश काशिनाथ सुर्वे, शिपाई अरूण गदेे्र, आदीची उपस्थितीसह मोठया संख्येने पतसंस्थेचे सभासद वर्ग उपस्थित होते.
सुमित्र पतसंस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रारंभी दिवंगताना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली, त्यानंतर मान्यवर उपस्थिताचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून पतसंस्थेचे चेअरमन कमळाकर साखळे यांचे हस्ते करण्यात आले. मागील दि. 24/09/2022 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्ताव वाचून कायम करणे, संचालक मंडळाने सादर केलेला सन 2022-23 या आर्थिक वर्षाच्या ताळेबंद व नफा तोटा पत्रक वाचून स्विकृत करणे, सन 2022-23 सालचा अहवाल वाचून मंजूरी देणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या नफा वाटणी प्रस्तावास मंजूरी देणे, व लाभाश जाहीर करणे, सन 2023-24 चे उत्पन्न व खर्चाचे अंदाज पत्रकास मान्यता देणे,
सन 2022-23 या वर्षातील अंदाजीत रक्कमेपेक्षा जास्त झालेल्या खर्चास मान्यता देणे, सन 2022-23 अखेरच्या शासकीय लेखा परिक्षण अहवालावर विचार करणे, व स्विकृत करणे, सन 2022-23 अखेरच्या या आर्थिक वर्षाचे अंतर्गत लेखा परिक्षण व शासकीय लेखा परिक्षकांची नेमणूक करणे, व शासकीय लेखा परिक्षणाकरीता लेखा परिक्षकांची नेमणुक करणे, संचालक मंडळाने शिफारस केलेल्या उपविधी दुरूस्तीबाबत विचार करणे व मंजूरी घेणे आदी विषय सभेत घेण्यात आले.
यावेळी महाराष्ट ्र राज्य सहकारी पतसंस्था पुणे येथील प्राध्यापक एस.बी. वाटाणे यांनी सभासद, सहकारी, शिक्षण व प्रशिक्षण क्रार्यक्रम अंतर्गत संचालक,कर्मचारी, व सभासद यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. तसेच यावेळी तसेच प्रतिवर्षा प्रमाणे दहावी व बारावी इयत्तेतील गुणवंत विदयार्थ्याचा सत्कार पतसंस्थेचे अध्यक्ष तसेच संचालक मंडळ यांचे हस्ते करण्यात आला. या सभेचे सुत्रसंचलन व अहवाल वाचन पतसंस्थेच्या व्यवस्थापक क्रांती जाधव यांनी केले.
यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष कमळाकर साखळे यांची अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीवर अध्यक्ष म्हणून निवड, व पतसंस्थेचे उपाध्यक्ष खलिल तांडेल व सलिम तांडेल यांची अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार पतसंस्थेचे वतीने करण्यात आला