रेवदंडयातील आराध्य दैवत श्री मारूती रायांची पालखी सोहळा संपन्न

रेवदंडयातील आराध्य दैवत श्री मारूती रायांची पालखी सोहळा संपन्न
श्रावण मास निमित्ताने अष्ट्रोप्रहर भजनी सप्ताहाची समाप्ती
रेवदंडा-महेंद्र खैरे- रेवदंडयातील आराध्य दैवत श्री मारूती रायांची पालखी सोहळा नुकताच संपन्न झाला, प्रतिवर्षाप्रमाणे पारंपारीक अष्ट्रोप्रहर भजनी सप्ताहाचे सुध्दा समाप्ती झाली.
रेवदंडा शहराचे आराध्य दैवत व पेशवेकालात जिर्णोध्दार झाल्याचा उल्लेख असलेले ऐतिहासिक मंदिरात श्रावणी सप्ताहाचे निमित्ताने गेले अष्ट्रोप्रहर भजनी सप्ताह संपन्न झाला, त्यानंतर श्री मारूतीरायांची पालखी सोहळा भाविकतेने मोठया उत्साहात संपन्न झाला. श्रावणी सप्ताहाचे निमित्ताने रेवदंडा पारनाका येथील श्री मारूती मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. असंख्य भाविकांनी मोठया श्रध्देने व भक्तीने श्री मारूतीरायांचे दर्शनाचा लाभ घेतला.
प्रतिवर्षा प्रमाणे श्रावणी सप्ताहाचे समाप्ती पर्व समाप्त झाल्यानंतर मंगळवार दि. 5 सप्टेबर रोजी श्री मारूती रायाचा पालखी सोहळा संपन्न झाला. पारंपारीक पध्दतीने श्री मारूती रायांच्या पालखी रेवदंडा शहरातून काढण्यात आली. यावेळी घराघरातून व रस्तारस्तो अनेक भाविकांनी श्री मारूती रायांच्या पालखी नतमस्तक होऊन पुजाअर्चाचा लाभ घेतला. यावेळी पालखी समवेत भजन, ढोल ताश्या, बॅडपथक यांचा समावेश होता, तर मोठया संख्येने पालखीसह श्री मारूती रायांच्या जल्लोषात मोठया भक्तीभावाने रमले होते, यावेळी भगवी पताका भडकवून भक्तीमय वातावरण निर्मिती झाली होती.
रेवदंडा श्री मारूती मंदिर देवस्थान कमिटी, तसेच अष्ट्रोप्रहर भजनी मंडळ सदस्यांच्या अविरत परिश्रमाने श्री मारूती मंदिर श्रावणी सप्ताह व पालखी सोहळा संपन्न झाला.