चौल बेलाई येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

चौल बेलाई येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
रेवदंडा-महेंद्र खैरे- माणुसकी प्रतिष्ठान, जीतनगर, महाराष्ट्र व उत्कर्ष महिला मंडळ, चौल बेलाई यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत नारायण लक्ष्मण नाईक यांच्या स्मृती दिना निमित्त दिनांक ३ सप्टेंबर २०२३ रोजी सर्व ग्रामस्थांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरात चौल बेलाई ता. अलिबाग येथील सुमारे 100 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आजाराची लक्षणे दिसणाऱ्या ग्रामस्थांना मोफत औषधे देण्यात आली.
सदरचे आरोग्य तपासणी शिबिर श्री काळभैरव मंदिर चौल बेलाई येथे आयोजित करण्यात आले. चौल बेलाई, येथील सामाजिक कार्यकर्ते, माजी ग्राम पंचायत सदस्य दिवंगत नारायण लक्ष्मण नाईक यांचे स्मृतिदिनी शिबिराचे आयोजन करण्यात आले. माणुसकी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांच्या मार्गदर्शना खाली डॉ. श्रीयश पाटील, डॉ. पुजा गुंजाळ, डॉ. केतन ठोकळ तसेच टेक्निशियन ऋषी वाडकर, अमेय ढोरे यांच्या पथकाने नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
उपस्थितांचे स्वागत उत्कर्ष महिला मंडळ च्या अध्यक्ष रोहिणी म्हात्रे, नम्रता नाईक, ग्रामस्थ मंडळा तर्फे मदन ठाकूर, चिंतामण मळेकर यांनी केले. आभार हरिश्चंद्र म्हात्रे यांनी व्यक्त केले. शिबिर यशस्वी करण्या साठी हर्षला म्हात्रे, संगीता ठाकूर, पल्लवी नाईक, केतन म्हात्रे, स्वराज नाईक , नयनेश नाईक, तसेच उत्कर्ष महिला मंडळ मधील सर्व महिला यांनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी कृषक सेवा संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर राऊळ तसेच रामचंद म्हात्रे, नंदकुमार नाईक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.



