ताज्याघडामोडी

चोरढे येथे शिंदे गट शिवसेनेचा शेकापक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसला दे धक्‍का

चोरढे येथे शिंदे गट शिवसेनेचा शेकापक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसला दे धक्‍का
ग्रा.प. माजी सरपंच माजी उपसरपंच समर्थकासह शिंदे गट शिवसेनेत

रेवदंडा-महेंद्र खैरे- मुरूड तालुक्यातील चोरढे येथील शेकापक्षाचे माजी ग्रा.प. सरपंच, माजी उपसरपंच, तसेच वळके व तळेखार ग्रामपंचायत हद्दीतील शेकापक्ष व ग्रामस्थांनी शिंदे गट शिवसेनेत आम. महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास दाखवून पक्ष प्रवेश घेतला. चोरढे येथील शिंदे गट शिवसेनेचे कार्यकर्ते अनिल चोरढेकर यांच्या विशेष प्रयत्नातून हा पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.
आमदार महेंद्रशेठ दळवी यांचे अलिबाग-चाळमला येथील कार्यालयात दि. 28 ऑगस्ट रोजी पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चोरढे ग्रामपंचायतीतील शेकापक्षाचे माजी सरपंच कमल काशिनाथ तांबडे व माजी उपसरपंच काशिनाथ तांबडे व समर्थक कार्यकर्ते चोरढे ग्रा.प. माजी सरपंच राम महादेव भोपी, चोरढे ग्रा.प. माजी उपसरपंच धर्मा रामजी चोरढेकर, वळके ग्रा.प. माजी ग्रा.प. सदस्य हिराबाई वसंत शेडगे, तळेखार रोहिदास वाडी हरिजन समाज अध्यक्ष राजेंद्र धोंडसेकर, शेकापक्षाचे युवा कार्यकर्ते ताडगांव बौध्द समाज अध्यक्ष शेकापक्षाचे युवा कार्यकर्ते सुरेश पवार, सुरेश तांबडे, शेकापक्षाचे रमेश वाघ, नरेंद्र वाघे, सदानंद भोपी, मछिंद्र शेडगे, पुष्पा भास्कर डोलकर, दैवता संतोष दुकले, यशोदार शांताराम डोलकर, मुस्लिम समाज शेकाप कार्यकर्ते अल्ताफ मुजावर, जहुर उलडे, तसेच चोरढे येथील शेकापक्ष कार्यकर्ते मंथना नंरेद्र वाघे, बाबू काजारे, किसन चोरडेकर, महेंद्र चोरढेकर, बाबू शेडगे, विजय शेडगे, गजानन भोईर, काशिनाथ भोईर, मालती चोरढेकर, मंदा पाटील, तसेच सावरोली ग्रामस्थ रामदास ठाकूर, सहदेवी गंगाराम भोईर, धर्मा सहदेव भोईर, भालचंद्र सुभेदार, हरिश्‍चंद्र ठाकूर, तळेखार ग्रा.प. हद्दीतील शिवगाव ग्रामस्थ ज्ञानेश्‍वर पाटील, नागु हाशा काटकर, मंजूळा कमळया पाटील, मनिषा महादेव काटकर, रपूल भोईर, दत्‍ता गणेश ठाकूर, जनार्दन पाटील, ताडगांव ग्रामस्थ रामचंद्र कांबळे, अमर पवार, प्रतिक शिंदे, सिरिश वाघमारे, मुकूंद पवार आदी चोरढे, वळके, व तळेखार ग्रामपंचायत हद्दीतील शेकापक्ष कार्यकर्ते व ग्रामस्थांनी बहसंख्येने आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेवीत शिंदे गट शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.
या प्रसंगी अलिबाग-मुरूड विधानसभा आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी भगवी शाल परिधान करून सर्व पक्ष प्रवेश करणार्‍या कार्यकर्त्याचे स्वागत केले. यावेळी चोरढे येथील शिंदे गट शिवसेना कार्यकर्ते अनिल चोरढेकर व जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश घाटवळ यांची उपस्थिती होती. यावेळी शिंदे गट शिवसेनेत पक्ष प्रवेश घेतलेल्या सर्वाना शुभेच्छा देऊन प्रवेश घेतलेल्या सर्व कार्यकर्त्याना नित्याने सहकार्य दिले जाईल तसेच चोरढे, वळके व तळेखार ग्रामपंचायत हद्दीत विकास कामाना निधी उपलब्ध करून देण्याचा निश्‍चित प्रयन्त करणार असा विश्‍वास दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *