महाजने येथे अंतर्गत रस्ता नुतनीकरणाचे भुमिपुजन

महाजने येथे अंतर्गत रस्ता नुतनीकरणाचे भुमिपुजन
रेवदंडा-महेंद्र खैरे-अलिबाग तालुक्यातील महाजने येथे अंतर्गत रस्ता नुतनीकरणाचे भुमिपुजन कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
या प्रसंगी जिल्हा परिषद माजी सदस्या मानसीताई दळवी, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे, शिंदे गट शिवसेना तालुका प्रमुख अनंतराव गोंधळी,बेलोशी ग्रा.प.सरपंच कृष्णा भोपी, शिंदे गट शिवसेना अलिबाग उपतालुका प्रमुख अरूण भगत, शिवसेना रामराज विभाग प्रमुख अँड महेश शिंदे, शिंदे गट माजी विभाग प्रमुख पुथ्वीराज पाटील, बेलोशी ग्रा.प.उपसरपंच गितांजली पारंगे, ग्रामपंचायत सदस्य सदानंद नाईक, जयवंत थळे, सदानंद पाटील, पंएरीनाथ पारंगे, प्रकाश पारंगे, जयवंत पारंगे, युवासेना महाजने शाखा प्रमुख प्रितेश पारंगे, राकेश अवचटकर, वळवळी ग्रामस्थ नामदेव पाटील, विठोबा खानावकर,प्रदीप देसाई, मदन पाटील, दत्तात्रेय सुतार, महेश पाटील, उल्हास चाचड, नारायण पारंगे, महाजने ग्रामस्थ व महिला यांची उपस्थिती होती
प्रारंभी जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे, उपस्थित मान्यवर व जेष्ठ ग्रामस्थ महाजने यांचे शुभहस्ते रस्ता नुतनीकरण कामाचे भुमिपुजन करण्यात आले, त्यानंतर येथील मंदिरात विशेष कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आले. यावेळी मानसीताई दळवी, अनंतराव गोंधळी आदीने उपस्थितांना मार्गदर्शन केले.