ताज्याघडामोडी

शिंदे गट शिवसेना रास्ता रोकोचा इफेक्ट ….अखेर बोर्ली नाक्यावर रस्ता कॉक्रिटीकरणास आरंभ

….अखेर बोर्ली नाक्यावर रस्ता कॉक्रिटीकरणास आरंभ
शिंदे गट शिवसेना रास्ता रोकोचा इफेक्ट

रेवदंडा-महेंद्र खैरे- मुरूड तालुक्यातील बोर्ली नाक्यावरील अत्यंत दयनिय अवस्थेत असलेल्या रस्त्या कांक्रिटीकरणास प्रारंभ झाला आहे. साळाव मुरूड रस्ताचे नुतनीकरण व दुरूस्ती मुरूड पर्यटनासाठी पर्यटकांच्या सुविधेसाठी व आगामी श्री गणेश उत्सवाचे पार्श्‍वभुमिवर येत्या पंधरा दिवसात करण्यात यावे असा इशारा रास्ता रोको आंदोलनात सार्वजनिक बांधकाम खात्यास दिला होता. बोर्ली नाका रस्ता काक्रिटीकरण शिंदे गट शिवसेनेच्या रास्ता रोको आंदोलनाचा इफेक्ट असल्याचे म्हटले जाते.
बोर्ली नाका येथे नुकतेच या रस्ता कॉक्रिटीकरणाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मुरूड सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता गोरे, कनिष्ट अभियंता सुरज अनुसे, ठेकेदार धनेश तांबडकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश घाटवळ, शिंदे गट कार्यकर्ते सुरेश पालवणकर, जीवन परदेशी, शिंदे गट शिवसेना मुरूड तालुका युवासेना प्रमुख अमोल लाड, महेंद्र पाटील, आदीची उपस्थिती होती. बोर्ली नाका रस्ता कॉक्रिटीकरण शुभारंभ जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश घाटवळ यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. तसेच ठेकेदार धनेश तांबडकर यांनी रस्ता कॉक्रिटीकरण सुयोग्य करण्याचे आश्‍वासन कामाचे सुरूवातीस दिले.
गेल्या अनेक वर्षापासून साळाव-मुरूड रस्त्यावरील बोर्ली नाका रस्तावर खड्डेच खड्डे पडले होते, ऐन पावसाळयाचे दिवसात येथून वाहने चालविणे अत्यंत त्रासदायक होते. यामुळे वाहने, चालक, पर्यटक, व प्रवासीवर्ग यांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. या रस्ताच्या नुतनीकरण व दुरूस्तीसाठी विविध सामाजीक, राजकीय व जेष्ठ नागरिक संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्यास निवेदन देण्यात आले होते. तसेच मुरूड-साळाव या मुख्यः रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावरील खड्डी उखडली असल्याने अनेक अपघात होत आहेत, स्थानिकासह पर्यटकांना सुध्दा अतोतना त्रास सहन करावा लागतो आहे, या रस्ताचे नुतनीकरण व दुरूस्ती गणेशत्सोवापुर्वी करण्यात यावी अशी मागणीसाठी मुरूड तालुका शिवसेना शिंदे गट यांनी दि. 29 ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन बोर्ली नाक्यावर छेदले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *