कै. संजय म्हात्रे स्मृती चषकांच्या प्रथम विजेते विलास धाटावकर

रेवदंडयातील नारळ पोर्णिमेच्या नामांकित नारळ फोडी स्पर्धेत
कै. संजय म्हात्रे स्मृती चषकांच्या प्रथम विजेते विलास धाटावकर
रेवदंडा-महेंद्र खैरे- नारळी पौर्णिमे निमित्त पंचवीस वर्षाची परंपरा जपलेल्या रेवदंडयातील जेष्ठ कार्यकर्ते सुहास घोणे आयोजीत रेवदंडा-चौल ग्रामस्थ मंडळाच्या नारळ फोंडी स्पर्धेत नारळ फोडी स्पर्धेतील जिल्हातील नामांकित स्पर्धक विलास धाटावकर-रेवदडा यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच व्दितीय क्रमांक निखिल वारगे-स्वप्निल केळसकर-दिवेआगर, तृतीय क्रमांक केदार मळेकर-चौल , चतुर्थ क्रमांक प्रथमेश बनिया-रेवदंडा यांनी पटकाविले, तर शिस्तबंध्द संघ साई स्पोर्टस्-रेवदंडा जास्त नारळ फोंडया संघ विलास धाटावकर-रेवदंडा, उत्कृष्ट मारेकरी-तुषार धाटावकर-रेवदंडा, नवोदित मारेकरी-प्रसाद पाटील-चौल यांची निवड करण्यात आली.
रेवदंडा-चौल ग्रामस्थ आयोजीत नारळ फोंडी स्पर्धा आयोजक सुहास घोणे व अध्यक्ष संदेश बेडेकर यांचे मार्गदर्शनाखाली सायकांळी चार वाजता प्रारंभ झाला. या स्पर्धेचा मैदान क्रमांक एक चा शुभारंभ जेष्ठ कार्यकर्ते शरद गोंधळी यांचे हस्ते व मैदान क्रमांक दोनचा शुभारंभ शिंदे गट शिवसेना अलिबाग तालुका संघटक प्रफुल्ल मोरे यांचे हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत एकूण 32 संघ सहभागी झाले होते.
नारळी पौर्णिमेचया निमित्ताने आयोजीत नारळ फोंडी स्पर्धेला प्रतिवर्षा प्रमाणे रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला, रात्री नऊ वाजता स्पर्धा संपन्न झाली, यावेळी बक्षिस वितरण कार्यक्रमास ठाकरे गट शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिंदे गट शिवसेना अलिबाग तालुका संघटक प्रफुल्ल मोरे, माजी ग्रा.प.सदस्य संदिप खोत, चौल ग्रा.प.उपसरपंच अजीत गुरव, शेकापक्ष शहर अध्यक्ष सलिम गोंडेकर, असिफ गोंडेकर, रमेश वार्डे, सुभाष शेळके, राजेंद्र नाईक, भारत वाडेकर, मंगेश मढवी, प्रमोद म्हात्रे, दिपेश पाटील, राहूल हेमंत गणपत, सिध्देश मळेकर, मुनाफ गोंडेकर, आदी मान्यवराचीं उपस्थिती होती.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकास 11 हजार 111 रूपये व भव्य कै. संजय म्हात्रे स्मृती चषक व महेश कवळे पुरस्कृत कै. विष्णू आचरेकर चषक, व्दितीय क्रमांकास 6 हजार 666 रूपये व कै.लक्ष्मीबाई घोणे यांचे स्मरणार्थ चषक व महेश कवळे पुरस्कृत कै. विष्णु आचरेकर स्मृती चषक, तृतीय क्रमांकास 3 हजार 333 रूपये व भव्य कै.कल्पना मधुकर नाईक यांचे स्मरणार्थ स्मृती चषक, व महेश कवळे पुरस्कृत कै. विष्णू आचरेकर स्मृती चषक, चतुर्थ क्रमांकास 3 हजार 333 रूपये व समर्थ कृपा टे्रडर्स चौल भव्य चषक व महेश कवळे पुरस्कृत कै. विष्णू आचरेकर स्मृती चषक तसेच अलिशेठ गोेंडेकर यांचे स्मरणार्थ शिस्तबंध्द चषक, दक्ष पाटील पुरस्कृत उत्कृष्ट मारेकरी चषक, दक्ष पाटील पुरस्कृत नवोदीत मारेकर चषक उत्कृष्ट नारळ अनमोल मोबाईल पुरस्कृत स्मार्ट वॉच अशी बक्षिसे मान्यवराचे हस्ते विजेत्यांना वितरीत करण्यात आली. या स्पर्धेचे सुत्रसंचलन व समालोचन सुहास घोणे यांनी केले तसेच स्पर्धेत गुणलेखनाचे काम बंटी शेळके व मंगेश मढवी यांनी पाहिले व नारळ तपासणी यांनी केली. तर पंचाचे काम अजीत पाटील, अरूण घरत, जयवंत पाटील व चंद्रकांत धाटावकर यांनी पाहिले, स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सुहास घोणे व दिपेश पाटील मित्रमर्ंडळ रेवदंडा-चौल ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.