कोर्लई व थेरोंडयात सापडली चरस अमली पदार्थाची पाकिटे-जिल्हातील समुद्र किनारे सतर्क

कोर्लई व थेरोंडयात सापडली चरस अमली पदार्थाची पाकिटे-जिल्हातील समुद्र किनारे सतर्क
24 किलो 908 ग्रॅम वजनाचा रूपये 99 लाख 63 लाख 200 रूपये किमंतीचा चरस नावाचा अमंली पदार्थ पोलिसांच्या ताब्यात
रेवदंडा-महेंद्र खैरे-श्रीवर्धन पाठोपाठ अमली पदार्थाच्या पिशव्या मुरूड अलिबाग तालुक्यातील समुद्र किनारी सापडण्यास सुरूवात झाली आहे, रेवदंडा पोलिस ठाणे हद्दीतील अलिबाग तालुक्यात थेरोंडा व मुरूड तालुक्या कोर्लई समुद्र किनारी एकूण 24 किलो 908 ग्रॅम वजनाचा रूपये 99 लाख 63 लाख 200 रूपये किमंतीचा चरस नावाचा अमंली पदार्थ असलेला मुद्देमाल सापडल्याने खळबळ उडाली आहे.
श्रीवर्धन पाठोपाठ रेवदंडा पोलिस ठाणे हद्दीत मुरूड तालुक्यात कोर्लई व अलिबाग तालुक्यात थेरोंडा येथे चरस या अमली पदार्थाची पाकिटे सापडल्याने जिल्हातील समुद्र किनारी पोलिस सतर्क झाले आहेत. रेवदंडा व थेरोंडा समुद्र किनारी एकूण 11 पाकिटे सापडली असून जिल्हात समुद्र किनारी चरस या अमली पदार्थाची 118 पाकिटे सापडली असून सुमारे 4.5 कोटी रूपयांचा मुुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
रेवदंडा पोलिस ठाणे हद्दीतील मुरूड तालुक्यातील मौजे कोर्लई व अलिबाग तालुक्यातील थेरोंडा येथील समुद्र किनारी दि. 30 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजल्यानंतर चरस या अंमली पदार्थाची पाकिटे वाळू मध्ये असल्याची खबर पोलिसांना लागली. रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल अतिग्रे व उपनिरिक्षक शिवकुमार नंदगावे यांनी तातडीने घटनास्थळी पोलिस कुमकेसह धाव घेतली. या ठिकाणी सापडून आलेल्या पाकिटावर समोरील बाजूस मध्यभागी गोल आकारात गरूडाचे व नागाचे चिन्ह व त्याच्या बाजूला इंग्रजी मध्ये लिहलेले दिसते व सदर पाकिटांवर उर्दु लिपीमध्ये छापील अक्षरे असलेली तसेच वरील प्लष्टिकचे आवरण काढून आत मध्ये लालसर रंगाची नक्षीदार प्लाष्टीक आवरण पाकिट असलेले व सदर पाकिटावर इंग्रजीमध्ये लिहलेले अशी एकूण नऊ प्लाष्टीक पिशवीची पाकिटे व काही फाटलेल्या पाकिटामधून बाहेर येवून तुकडे पडून वाळू मध्ये पसरलेल्या हिरवट काळसर रंगाचा पदार्थ असा मौजे कोर्लई समुद्र किनारी 13 किलो 720 ग्रॅम वजनाचा अंदाजे रूपये 54 लाख 88 हजार रूपये किमंतीचा चरस नावाचा अंमली पदार्थ तसेच थेरोंडा समुद्र किनारी 11 किलो 188 ग्रॅम वजनाचा एकूण 44 लाख 75 हजार 200 रूपये किमंतीचा असा एकूण 24 किलो 908 ग्रॅम वजनाचा रूपये 99 लाख 63 लाख 200 रूपये किमंतीचा चरस नावाचा अमंली पदार्थ असलेला मुद्देमाल सापडला आहे.
याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 175/2023 नुसार एन.डी.पी. एस.अधिनियम 1985-8 (सी) , 20 (बी) (ढढ) (सी) , 22 (सी) नुसार नोंद करण्यात आली आहे. रेवदंडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक शिवकुमार राजकुमार नंदगावे यांनी अज्ञात आरोपीचे विरोधात सपोनि राहुल अतिग्रे यांचे मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत.