नागाव मध्ये भव्य नारळ फोंडी स्पर्धेचा शानदार शुभारंभ

नागाव मध्ये भव्य नारळ फोंडी स्पर्धेचा शानदार शुभारंभ
शेकापक्ष महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचेसह मान्यवर मंडळीची उपस्थिती

रेवदंडा-महेंद्र खैरे- नागाव मधील सामाजीक व राजकीय कार्यकर्ते सचिन राऊळ व राकेश राणे मित्रमंडळाचे तवीने भव्य व आकर्षक बक्षिसाची नारळ फोंडी स्पर्धेचा शानदार शुभारंभ संपन्न झाला.
या नारळ फोडी स्पर्धेच्या उद्धाटन प्रसंगी शेकापक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची प्रमुख उपस्थितीसह माजी जि.प.सदस्य व्दारकानाथ्ज्ञ नाईक, माजी सरपंच नंदुशेठ मयेकर, नागाव ग्रा.प. माजी सरपंच निखिल मयेकर, माजी उपसरपंच मंजुषा राणे, माजी ग्रा.प.सदस्या हर्षदा मयेकर, माजी ग्रा.प.सदस्य शौकिन राणे, शैलेश चव्हाण, काँग्रेस युवा अध्यक्ष आकाश राणे, तसेच मुंबई कडील मान्यवर पाहूणे मंडळी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांचे हस्ते शिवप्रतिमेचे पुजन व शेकापक्ष महिला आघाडीच्या चित्रलेखा पाटील यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर सचिन राऊळ व राकेश राणे यांचे हस्ते शेकापक्ष महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या सत्कार पुष्पगूच्छ व स्मृृती चषक प्रदान करून करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवराचा सत्कार पुष्पगूच्छ व स्मृृती चषक प्रदान करून सचिन राऊळ व राकेश राणे यांचे हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकास रूपये 51 हजार रोख व भव्य चषक, तसेच व्दितीय क्रमांकस रूपये 21 हजार रूपये रोख, तृतीय व चतुर्थ क्रमांकास भव्य पारितोषीक व भव्य चषक अशी बक्षिसे ठेवण्यता आली आहेत. या स्पर्धेकरीता रत्नागिरी, पालघर, मुंबई, आदी ठिकाणाहून स्पर्धक सहभागी झाले आहेत. एकूण 24 संघाना थेट प्रवेश देण्यात आला आहे. या स्पर्धेची सुरूवात चित्रलेखा पाटील व हर्षदा मयेकर यांनी नारळ फोंडी स्पर्धेची सुरूवात नारळ फोंडी करून केली. तत्पुर्वीं उपस्थितांना मार्गदर्शन करताना चित्रलेखा पाटील यांनी सचिन राऊळ व राकेश राणे यांचे विशेष कौतूक व्यक्त केले व नारळ फोंडी स्पर्धा आयोजन करून परंपरा जपली असे सांगितले. स्पर्धेचे सुत्रसंचलन व समालोचन विकास पिंपळे यांचेवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी मोठया संख्येने रसिक प्रेक्षकांची उपस्थिती आहे.
