शितळादेवी येथील नारळ फोंडी स्पर्धेत संदेश गायकर प्रथम व्दितीक-अनंत फुटणकर, तृतीय-निखिल वारगे, उत्कृष्ट नारळ फोंडया-स्वप्निल केळस्कर

शितळादेवी येथील नारळ फोंडी स्पर्धेत संदेश गायकर प्रथम
व्दितीक-अनंत फुटणकर, तृतीय-निखिल वारगे, उत्कृष्ट नारळ फोंडया-स्वप्निल केळस्कर

रेवदंडा-महेंद्र खैरे- श्रावण महिन्याच्या पुर्वाधात प्रतिवर्षी रेवदंडा व चौल मधील पारंपारीक नारळ फोंडी स्पर्धाना शानदार प्रांरभ शितळादेवी चौल येथील मैदानात झाला. चौल शितळादेवी येथे कै. नथुराम महादेव गुरव यांचे स्मरणार्थ चौल शितळादेवी मित्रमंडळाचे वतीने आयोजीत नारळ फोंडी स्पर्धेत प्रथम क्रमांक संदेश गायकर-चौल बेलाई, व्दितीय क्रमोंक अनंत फुटणकर-श्रीवर्धन, तृतीय क्रमांक निखिल वारगे-दिवे आगर यांनी पटकाविले तर स्पर्धेतील उत्कृष्ट नारळ फोंडया-स्वप्निल केळस्कर यांची निवड करण्यात आली.

नारळ पोफळीच्या बागायतीसाठी प्रसिध्दीस असलेल्या चौल व रेवदंडा मधील श्रावणातील नारळ फोडी स्पर्धेना वेगळचं महत्व असते. या नारळ फोंडी स्पर्धेची आगळीकता फार वेगळीचे असते, मोठा रसिक प्रेक्षकवर्ग या नारळ फोंडी स्पर्धेना लाभतो, तर महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे आदी शहरासह रायगड जिल्हातील मातब्बर नारळ फोंडी स्पर्धक प्रतिवर्षी स्पर्धेत सहभागी होत असतात. एक खेळाडू नारळ जमिनीवरून घरगळत सोडतो तर प्रतिस्पर्धी खेळाडू हातातील नारळाचा जोरदार फटका त्या नारळावर मारून फोडतो, यामध्ये एक नारळ फुटतो,कधी कधी दोन्ही फुटतात, या नारळ फोंडी स्पर्धेत ज्याचे नारळ शिल्लक राहतात, तो स्पर्धेचा विजेता ठरतो. संपुर्ण रायगड जिल्हात हातावर नारळ फोंडी स्पर्धा होत असतात, मात्र जमिनीवरून घरगळत नारळ फोंडी स्पर्धा इतर स्पर्धापेक्षा वेगळी असते त्यामुळे नारळ फोंडी स्पर्धेची वेगळीच आगळीकता पहावयास मिळते.

शितळादेवी मित्रमंडळ आयोजीत नारळफोडी स्पर्धेचा प्रारंभ रविवार दि. 13 ऑगस्ट रोजी दुपारी तिन वाजता जेष्ठ नागरिकांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला, स्पर्धेत एकूण 24 संघानी थेट प्रवेश घेतला होता. स्पर्धेत पंचाचे काम अजीत पाटील, चंद्रकांत धाटावकर, मंगेश काटकर, जयवंत पाटील, गुणलेखनाचे काम दिपेश पाटील, प्रणेश म्हात्रे तर स्पर्धेचे धावते वर्णन तेजस शिंदे यांनी केले. स्पर्धेत प्रथम क्रमांकास सामाजीक कार्यकर्ते सचिन राऊळ पुरस्कृत एलजी फ्रीज, व्दितीय क्रमांकास एलएडी 32 इंच टिव्ही,तृतीय क्रमांकास बजाज कुलर व स्पर्धेतील उत्कृष्ट नारळ फोंडयास प्रतिक गुरव पुरस्कृत चषक तसेच स्पर्धेत प्रथम,व्दितीय व तृतीय क्रमांकास प्रतिक गुरव पुरस्कृत चषक आदी बक्षिसे ठेवण्यात आली होती.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सामाजीक कार्यकर्ते सचिन राऊळ, दिवेआगर सरपंच सिध्देश कोसंबे, चौल ग्रा.प. उपसरपंच अजीत गुरव, राजेंद्र गुरव, विश्वनाथभाई मळेकर, चौल ग्रा.प.सदस्या कल्याणी बाजी, नारायण घरत, अजीत मिसाळ, नंदकुमार नाईक, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या स्पर्धेसाठी शितळादेवी मित्र मंडळाचे वतीने केदार मळेकर, दिपेश गुरव, प्रतिक गुरव, मंदार वर्तक, प्रसाद नाईक, सुयश माळी, कुणाल घरत आदीने विशेष परिश्रम घेतले.
