चौल रामेश्वर पुष्करणीत स्वातंत्रदिनाचे निमित्ताने भव्य जलतरण स्पर्धा

चौल रामेश्वर पुष्करणीत स्वातंत्रदिनाचे निमित्ताने भव्य जलतरण स्पर्धा
रेवदंडा-महेंद्र खैरे- प्रतिवर्षा प्रमाणे चौल रामेश्वर पुष्करणीत 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनाचे औचित्याने भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
चौल रामेश्वर मित्रमंंडळाचे वतीने गेले अनेक वर्ष 15 ऑगस्ट स्वातंत्रदिनाचे औचित्याने भव्य जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धेत प्रतिवर्षी जिल्हातील नामवंत जलतरणपटूनी सहभाग घेऊन स्पर्धेस नावलौकिक मिळवून दिला आहे. स्पर्धा ही गटानुसार भरविण्यात येत असून प्रत्येक गटातील प्रथम,व्दितीय व तृतीय व उत्तेजनार्थ क्रमाकांस बक्षिसे वितरीत केली जातात. सर्वाधीक बक्षिसे प्राप्त व मोठया गटात सुयश मिळविणारा संघास भव्य चषक चौल रामेश्वर मित्रमंडळाचे वतीने देण्यात येतो.
या स्पर्धेचे अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी चौल रामेश्वर येथील भाग्यश्री ज्वेलर्स येथे थेट तसेच भ्रमणध्वनी क्रमांक 9273213435 व जितेंद्र जाधव यांचे गॅरेज मध्ये थेट व भ्रमणध्वनी क्रमांक 9260618883 या क्रमांकावर संपर्क साधण्यात यावा असे आवाहन चौल रामेश्वर मित्रमंडळाचे वतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेचे नियम व अटी स्पर्धेपुर्वी जाहीर करण्यात येतील असे आयोजकांचे वतीने कळविण्यात आले आहे.