कोर्लई कोळीवाडयात संपुर्ण शारिरीक मोफत तपासणी शिबीर संपन्न
कोर्लई कोळीवाडयात संपुर्ण शारिरीक मोफत तपासणी शिबीर संपन्न
रेवदंडा-महेंद्र खैरे- मुरूड तालुक्यातील कोर्लई येथील कोळीवाडयात कोर्लई शिवसेना शाखेच्या वतीने संपुर्ण शारिरक मोफत तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले होते.
अलिबागचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या सहकार्याने व कोर्लई शिवसेना शाखा यांचे नियोजनाने कोर्लई कोळीवाडयातील कै. गोविंद आग्रावकर यांचे निवासस्थानी सकाळी दहा ते दुपारी दोन व दुपारी तिन ते सायकांळी सहा वाजेपर्यंत संपुर्ण शारिरीक मोफत तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबीरास नॅच्युयेपेथी कंस्लटंट डॉ. मोनिश नरसियन,नॅच्युयेपेथी कंस्लटंट डाँ. राज सामंत क्लिनिकल डायटिशयन वैभव पेडणेकर यांचे विशेष योगदान लाभले तर शिवसेना मुरूड उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य जयेंद्र बलकवडे, बुथ प्रमुख दत्ताराम पाटील, ग्रामपंचायत सदस्य सेड्रा आलेक्स, बुथ प्रमुख योगेश पाटील, शिवसेना, शिवसेना युवा अधिकारी मुरूड उपतालुका प्रमुख विकी वेगस, बुथ प्रमुख जयेश म्हात्रे, माजी ग्रा.प.सदस्य प्रशांत भोय, बुथ प्रमुख महेश पाटील, बुथ प्रमुख जॉयेल डॉमनिक पेय, मिठेखार येथील मोहन ठाकूर तसेच कोर्लई ग्रामस्थ आदीची उपस्थिती होती.
प्रारंभी शिवसेना उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील यांनी प्रास्ताविकेत या संपुर्ण शारिरीक मोफत तपासणी शिबीर आम. महेंद्रशेठ दळवी यांच्या सहकार्याने होत असल्याचे सांगून शिबीरातील उपचारा संदर्भात माहिती दिली. या शिबीरास मोठया संख्येने उपस्थित राहून संपुर्ण शारिरिक मोफत तपासणीचा लाभ घेतला. त्यानंतर आयोजकांचे हस्ते उपस्थित डॉक्टर्स नॅच्युयेपेथी कंस्लटंट डॉ. मोनिश नरसियन,नॅच्युयेपेथी कंस्लटंट डाँ. राज सामंत क्लिनिकल डायटिशयन वैभव पेडणेकर यांचे पुष्पगुच्छ पदान करून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर्स नॅच्युयेपेथी कंस्लटंट डॉ. मोनिश नरसियन यांनी उपस्थितांना संपुर्ण शारिरीक मोफत तपासणी सहकार्य देण्याचे आवाहन केले.