माजी सैनिकांचा सत्कार; चौल ग्रामपंचायतीचा क्रांतीदिनाचे औचित्याने स्तुत्य उपक्रम

माजी सैनिकांचा सत्कार; चौल ग्रामपंचायतीचा क्रांतीदिनाचे औचित्याने स्तुत्य उपक्रम
रेवदंडा-महेंद्र खैरे- 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्याने चौल ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत हद्दीतील माजी सैनिकांचा हद्य सत्काराचे स्तुत्य उपक्रम राबविला. चौल ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चौल ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत माजी सैनिकांचा सत्कार कार्यक्रम क्रांतीदिनाचे औचित्याने घेण्यात आला.

यावेळी सरपंच प्रतिभा संजय पवार, उपसरपंच अजीत गुरव, ग्रामविकास अधिकारी रूतिका अक्षय पाटील, ग्रा.प.सदस्या रूपाली म्हात्रे, रोशन बलकवडे,सिंधू डोयले, अश्विनी राऊत, कल्याजी बाजी, माधवी टेकाळकर, संचिता भोईर, सानिका नाईक, निवेदिता मळेकर, तसेच ग्रा.प.सदस्य दत्तात्रेय अधिकारी, रघुनाथ भगत, शशिकांत म्हात्रे, निलेश नाईक, अतुल वर्तक, अजीत मिसाळ, नरेंद्र भोईर, तसेच ग्रामपंचायत कर्मचारीवर्ग यांची उपस्थिती होती.
चौल ग्रामपंचायतीच्या स्तुत्य उपक्रमास चौल हद्दीतील माजी सैनिक चौल जाखमाता- आत्माराम नारायण उळे, चौल भोवाळे-मनोज हरिश्ंचद्र नाईक, चौल तुलाडदेवी- दिलिप कृष्णा राऊत, चौल पिरांचे देऊळ-किशोर अनंत घरत, चौल चंपावती आळी – सुरेद्र बाळाराम महाले, या माजी सैनिकांना आमंत्रीत करण्यात आले होते. प्रारंभी दिप प्रज्वलन, भक्तीगीत, स्वातंत्रगीत गायनानंतर सरपंच प्रतिभा पवार, उपसरपंच अजित गुरव, ग्रा.प.सदस्या रूपाली म्हात्रे, ग्रा.प.सदस्या अश्विनी राऊत,ग्रा.प.सदस्य अतुल गुरव यांचे हस्ते माजी सैनिकांचा चौल ग्रामपंचायतीचे वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुरूवातीस उपस्थितांनी ध्वजवंदन केले. यावेळी माजी सैनिकांनी मनोगत व्यक्त केले, यामध्ये सैनिक कालावधीतील आठवणीना उजाळा दिला. तसेच चौल ग्रामपंचायतीचे वतीने करण्यात आलेल्या सत्काराचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी रूतिका अक्षय पाटील यांनी केले.