रेवदंडयात शिवसेनेचा विकास कामांचा भुमिपुजन सोहळा

रेवदंडयात शिवसेनेचा विकास कामांचा भुमिपुजन सोहळा
आम. महेंद्रशेठ दळवी यांचे हस्ते
रेवदंडा-महेंद्र खैरे- आम. महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रयत्नातून तिन कोटी रूपये निधीची विकास कामे रेवदंडा ग्रामपंचायत अंतर्गत होत असून या कामाचा भुमिपुजन सोहळा कार्यक्रम आज रविवार दि. 30 जुलै रोजी सायकांळी चार वाजता भंडारी समाज हॉल मोठे बंदर येथे संपन्न होणार आहे.
या भुमिपुजन सोहळा कार्यक्रमास शिवसेना शिंदे गटाचे अलिबाग-मुरूड-रोहा मतदार संघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी व शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी, अलिबाग तालुका शिवसेना प्रमुख प्रफुल्ल मोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शेकापक्षाच्या बालेकिल्ल्ला म्हणून ओळखल्या जाणार्या रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत मागील विधानसभा निवडणूकीत आमदार महेंद्रशेठ दळवी यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. रेवदंडा-थेरोंडकरांच्या प्रेमाची जाण ठेवीत आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रयत्नाने रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीत तब्बल तिन कोटीची विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.
आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बाहय रस्ते विकास योजने अंतर्गत रेवदंडा किल्ला अंतर्गत रस्ता तयार करणे 15 लाख रूपये, लांबाते गल्ली ते सरदार गल्ली पर्यंत रस्ता तयार करणे 15 लाख रूपये, मौजे रेवदंडा अंतर्गत रस्ता तयार करणे 15 लाख रूपये, रेवदंडा हायस्कुल ते समुद्र किनारा रस्ता साकवसह तयार करणे 15 लाख रूपये, रेवदंडा गोळा स्टॉप ते यशवंत पिटनाईक यांचे घरापर्यंत रस्ता तयार करणे, रेवदंडा सुतार आळी क्रॉकिट रस्ता तयार करणे व गटार बांधणे 15 लाख रूपये, रेवदंडा बहिरी आळी क्रॉकिट रस्ता तयार करणे व गटार बांधणे15 लाख रूपये, रेवदंडा येथे अद्यावत मच्छीमार्केट बांधणे 15 लाख रूपये, थेरोंडा पानसेवाडी ते अळुकर वाडी पर्यंत रस्ता तयार करणे 15 लाख रूपये, थेरोंडा आप्पा अंबुकर चौक ते ज्ञानेश्वर टिवळेकर यांचे घरापर्यंत रस्ता तयार करणे 15 लाख रूपये, थेरोंडा खंडेरावपाडा अंतर्गत रस्ता तयार करणे15 लाख रूपये, आंग्रेनगर रस्ता तयार करणे15 लाख रूपये, रेवदंडा अंतर्गत रस्ता तयार करणे 15 लाख रूपये,थेरोंडा आगलेची वाडी येथे सामाजीक सभागृह बांधणे 25 लाख रूपये, रेवदंडा मुस्लिम समाज पागार मोहल्ला समाज सभागृह बांधणे, रेवदंडा मोठे बंदर भंडारी समाज सामाजीक सभागृह बांधणे 40 लाख रूपये विकास कामांना मंजूरी देण्यात आली आहे.
रेवदंडयातील शिंदे गट शिवसेना व आमदार महेंद्र दळवी समर्थत शिवसेना अलिबाग तालुका अध्यक्ष प्रफुल्लशेठ मोरे, यांचेसह रेवदंडा शहर अध्यक्ष योगेश पिटनाईक, शहर उपाध्यक्ष विजय हाडकर, सेक्रेटरी समीर आठवले, खजिनदार केदार खोत, तसेच सदस्य मन्सुर तांडेल, चंद्रकांत दांडेकर, विवेक दांडेकर, शैलश गोंधळी यांनी हा भुमिपुजन सोहळा कार्यक्रम मोठा दिमाखदारपणे पार पाडण्याचे निश्चित केले असून रेवदंडा भंडारी समाज हॉल सभागृहात मोठी गर्दी होईल असे म्हटले जात आहे.