ताज्याघडामोडीमहत्वाच्या बातम्या

सायकल वाटप मदत नव्हे तर कर्तव्य -चित्रलेखा पाटील साळाव मध्ये सावित्रीच्या लेकीना सायकल वाटप

सायकल वाटप मदत नव्हे तर कर्तव्य -चित्रलेखा पाटील साळाव मध्ये सावित्रीच्या लेकीना सायकल वाटप

रेवदंडा-महेंद्र खैरे- सायकल वाटप मदत नव्हे कर्तव्य म्हणून करते, असे ठोस उद‍्गार शेकापक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी साळाव येथे सावित्रीच्या लेकीना सायकल वाटप कार्यक्रमात उपस्थितांना संबोधीताना केले, यावेळी त्यांनी सावित्रीच्या लेकीनो शिका, मोठे व्हा पण गाव व शाळा यांना विसरू नका असे आवाहन केले.

साळाव येथील श्री मारूती मंदिराचे प्रांगणात साळाव विभाग शेकापक्षाचे वतीने शनिवार दि. 24 सप्टेबर रोजी सायकांळी सहाचे सुमारास सावित्रीच्या लेकीना सायकल वाटप कार्यक्रम शेकापक्षाच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांचे नियोजनातून केले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थितीसह शेकापक्षाचे संदिपभाई घरत, मुरूड तालुका चिटणीस अजित कासार, सहचिटणीस सि.एम. ठाकूर, अलिबाग तालुका पुरोगामी युवक अध्यक्ष विक्रांत वार्डे, साळाव ग्रा.प. माजी उपसरपंच मधुशेठ पाटील, बोर्ली ग्रा.प.सरपंच डाँ.चेतन जावसेन, उसरोली ग्रा.प.सरपंच मनिष नांगावकर, वळके ग्रा.प.उपसरपंच विजय म्हात्रे, मुरूड तालुका पुरोगामी युवक अध्यक्ष शरद चवरकर, साळाव ग्रा.प. सरपंच निलम पाटील, नागाव ग्रा.प.सदस्य हर्षदा मयेकर, आदेश पाटील, मयुर पाटील,शरद वरसोलकर,सुरेश खोत आदी शेकापक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

प्रारंभी प्रमुख अतिथी चित्रलेखा पाटील व मान्यवराचे हस्ते शिवप्रतिमेचे पुजन, दिपप्रज्वलन करण्यात आले, साळाव शेकापक्षाचे वतीने साळाव ग्रा.प. माजी उपसरपंच मधुशेठ पाटील यांचे हस्ते चित्रलेखा पाटील यांचा सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. तसेच उपस्थित मान्यवर मंडळीचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. यावेळी साळाव ग्रा.प. सरपंच निलम पाटील, निडी ग्रामस्थ, साळाव ग्रामस्थ, साळाव विदयार्थीनी, मुरूड चर्त्मकार संघटना, यांचे वतीने चित्रलेखा पाटील यांचा सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आला.

साळाव ग्रा.प. हद्दीतील 43 विदयार्थीनीना सायकलचे वाटप चित्रलेखा पाटील यांच्या वतीने मान्यवराचे हस्ते सावित्रीचा लेकी-विदयार्थीनीना करण्यात आले. उपस्थितांना संबोधीताना अजित कासार, संदिपभाई घरत, आदेश पाटील आदीने चित्रलेखा पाटील यांच्या कार्याची माहिती देऊन गौरवोद‍्गार काढले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी किशोर गायकर, आदेश पाटील, भालचंद्र साळावकर, दिपिका पाटील, हेमा साळावकर, आज्ञेश पाटील, भास्कर साळावकर, आदिनाथ सानेकर, गणेश जाधव, शंकर पाटील, रूपेश पाटील, कृष्णा शेळके, अनिल बापलेकर आदीने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंलचन कारखानीस मॅडम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *