रेवदंडा म.रा.वि.म चे ज्युनियर इंजिनियर जयेंद्र सकपाले यांना निरोपसलिम तांडेल व मित्रमंडळाचे वतीने सत्कार सोहळा

रेवदंडा म.रा.वि.म चे ज्युनियर इंजिनियर जयेंद्र सकपाले यांना निरोप
सलिम तांडेल व मित्रमंडळाचे वतीने सत्कार सोहळा
रेवदंडा-महेंद्र खैरे- रेवदंडा म.रा.वि.म. चे इन्चार्ज ज्युनियर इंजिनियर जयेंद्र सकपाले यांची नुकतीच जळगाव जिल्हात बदली झाल्याने त्यांचा निरोप कार्यक्रम सलिम तांडेल व मित्रमंडळाचे वतीने आयोजीत करण्यात आला होता.
रेवदंडा म.रा.वि.म कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे निमित्ताने सलिम तांडेल व मित्रमंडळाचे वतीने त्याचा विशेष सत्कार शिवप्रतिमा भेट देऊन यथोचीत शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आला. यावेळी सलिम तांडेल, हेमंत गणपत, साकिब लांबाते, सुहास घोणे, असिफ गोंडेकर, इक्बाल फटाकरे, दिपक वैदय, सचिन पवार, राहूल गणपत, सुजय नाईक,प्रथमेश कोळसेकर आदीची उपस्थिती होती.
रेवदंडा म.रा.वि.म चे इन्चार्ज ज्युनियर इंजिनियर जयेंद्र सकपाले हे गेले साडेचार वर्ष कार्यरत होते, त्यांच्या कार्यकाळात रेवदंडा व चौल परिसरात चक्रीवादळास सामोरे जावे लागले होते, यावेळी त्यांनी विशेष परिश्रम घेऊन रेवदंडा शहरातील विदयुत पुर्ववत करण्यास नियोजनबद्ध परिश्रम घेतले होते. त्यांचे रेवदंडा येथील सलिम तांडेल व मित्रमंडळाशी सलोख्याचे संबध नाते होते, त्यांची जळगाव येथे नुकतीच बदली झाली असून त्यांना निरोप कार्यक्रम सलिम तांडेल व मित्रमंडळाचे वतीने रेवदंडा म.रा.वि.म कार्यालयात दि. 15 जुलै रोजी सायकांळी साडेपाच वाजता आयोजीत करण्यात आला होता. यावेळी ज्युनियर इंजिनियर जयेंद्र सकपाले यांनी सलिम तांडेल व मित्रमंडळाचे विशेष आभार व्यक्त केले व नित्याने येथून जाताना रेवदंडयाची आठवण निश्चित ठेवून जाणार आहे असल्याचे म्हटले. उपस्थित सर्व जणांनी त्यांना पुष्पगूच्छ प्रदान करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या