काशिद-चिकणी मध्ये शेकापक्षाला खिंडार, शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश
शेकापक्ष मुरूड तालुका बाजार समिती अध्यक्षासह काशिद ग्रा.प. सरपंच नम्रता खेडेकर, उपसरपंच मयुरी धार्वे, सदस्य वर्षा दिवेकर,सदस्य विलास मोरे सह ग्रामस्थाचा पक्षप्रवेश
सर्वे येथे जलजीवन योजनेचे भुमिपुजन कार्यक्रम आम.महेंद्रशेठ दळवी यांचे हस्ते संपन्न.
रेवदंडा-महेंद्र खैरे- काशिद-चिकणी मध्ये शिवसेना शिंदे गटाने दसराच्या पुर्वीच राजकीय सिमोल्लंघन करून शेकापक्षाला मोठा धक्का देत खिंडार पाडले.
आम. महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवीत दि. 3 ऑक्टोबर रोजी काशिद ग्रामपंचायत अंतर्गत सर्वे येथे जनजीवन योजनेच्या भुमिपुजन कार्यक्रम निमित्ताने काशिद येथे पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला,
शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख भरतशेठ बेलोशे यांच्या प्रयत्नातून काशिद येथे पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी आम. महेंद्रशेठ दळवी यांच्या उपस्थितीत शेकापक्षाचे मुरूड तालुका बाजार समिती अध्यक्षासह काशिद ग्रा.प.सरपंच नम्रता खेडेकर, उपसरपंच मयुरी धार्वे, ग्रा.प.सदस्य विलास मोरे, सदस्या वर्षा दिवेकर याचेसह सुभाष खेडेकर, गावकी अध्यक्ष अमित खेडेकर,गजानन खेडेकर, गणेश चाचे, सुनिल खेडेकर, विशाल खेडेकर, रितेश दिवेकर, विलास दिवेकर, आदी असंख्य ग्रामस्थांनी शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश घेतला, आम. महेंद्रशेठ दळवी यांनी त्यांचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून् केले.
तत्पुर्वी आम. महेंद्रशेठ दळवी यांचे हस्ते काशिद ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सर्वे येथे जलजिवन योजनेचे भुमिपुजन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी िशिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख भरतशेठ बेलोशे, शिवसेना शिंदे गट मुरूड तालुका प्रमुख ॠषीकांत डोंगरीकर, शिवसेना शिंदे गट जिल्हा महिला संघटक शुभांगी करडे,शिवसेना शिंदे गट उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील, शिवसेनाशिवसेना मुरूड तालुका युवा सेना प्रमुख अमोल लाड आदीची शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुरूवातीस प्रमुख पाहूणे आम. महेंद्रशेठ दळवी व उपस्थित शिवसेना शिंदे गट पदाधिकारी यांचे स्वागत काशिद ग्रामपंचायतीचे वतीने पुष्पगूच्छ व शाल,श्रीफळ प्रदान करून करण्यात आले.