उमंग फांउडेशन, रेवदंडा वतीने विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य, व गणवेश वाटप

उमंग फांउडेशन, रेवदंडा वतीने विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य, व गणवेश वाटप
रेवदंडा राजिप शाळा विदयार्थ्यासाठी स्तुत्य उपक्रम
रेवदंडा-महेंद्र खैरे- रेवदंडा राजिप शाळा विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप कार्यक्रम उमंग फाउंडेशन रेवदंडा यांचे वतीने नुकताच संपन्न झाला.
उमंग फांउडेशन, रेवदंडा यांचे वतीने उमंग फांउडेशनचे दानिश गोंडेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्याने रेवदंडा राजिप शाळा विदयार्थ्याना वहया,पेन,पेन्सील आदी शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन रेवदंडा राजिप शाळा यांचे वतीने करण्यात आले होते.
यावेळी उमंग फाउंडेशन, रेवदंडाचे दानिश गोंडेकर, विक्रम सुर्वे, समीर तांडेल, मुहिब दिवेकर, स्वप्निल बुंराडे, अर्शद तांडेल, अमित कंटक, नाजिम मुकादम, अशरफ मुकादम, नितिन गायकवाड, अमोल गायकवाड, भुषण घरत, राहुल गणपत यांची उपस्थिती होती तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य प्रमोद नवखारकर, रेवदंडा राजिप शााळा मुख्याध्यापक रविंद्र थळे, शिक्षीका सुविधा पाटील, ज्योती म्हात्रे, संगिता कुलकर्णी व राजिप शाळा विदयाथीवर्ग यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात सरस्पती पुजनाने करण्यात आली, त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक रविद्र थळे यांनी उपस्थित व विदयार्थ्याना कार्यक्रमाचे नियोजनाची माहिती दिली. तर उमंग फांउडेशनच्या वतीने मुहिब दिवेकर यांनी उमंग फांउडेशनच्या वतीने प्रास्ताविक केले, यामध्ये त्यांनी उमंग फांउडेशन, रेवदंडा वतीने करण्यात येत असलेल्या स्तुत्य उपक्रमाची माहिती दिली. उमंग फाउंडेशनच्या वतीने विक्रम सुर्वे यांचे हस्ते प्रारंभी विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटपास सुरूवात करण्यात आली त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते विदयार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर उमंग फांउडेशनचे दानिश गोंडेकर यांच्या हस्ते विदयार्थ्याना व विदयार्थीना गणवेश वाटपास सुरूवात करण्यात आली त्यानंतर उपस्थितांच्या हस्ते विदयार्थ्याना व विदयार्थीना गणवेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे शेवटी शिक्षिका सुविधा पाटील यांनी उमंग फांउडेशनचे विशेष आभार व्यक्त केले, व भविष्यात त्यांचे वतीने अशीच सामाजीक बांधिलकीची कामे व्हावीत असे मनोगत व्यक्त केले.
