ताज्याघडामोडी

चौल भाटगल्‍ली डोंगरात बीज वृक्षारोपणास युवावर्गाचा मोठा प्रतिसाद

निसर्ग सोशल ग्रुपचा स्तुत्य उपक्रमाने
चौल भाटगल्‍ली डोंगरात बीज वृक्षारोपणास युवावर्गाचा मोठा प्रतिसाद

रेवदंडा-महेंद्र खैरे- निसर्ग सोशल ग्रुपच्या स्तुत्य उपक्रमाने चौल भाटगल्‍ली डोंगरावर बीज वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला, निसर्ग सोशल ग्रुप सदस्यासह युवावर्ग, विविध संस्था व चौल ग्रामस्थ, मित्रमंडळ यांच्या मोठा सहभागाने बीज वृक्षारोपण कार्यक्रम नुकताच उत्साहात संपन्न झाला.
चौल भाटगल्‍ली डॅम व मागील टेकडी परिसरात राकेश काठे यांच्या संकल्पनेतून निसर्ग सोशल ग्रुपच्या वतीने बीज वृक्षारोपण कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या बीज वृक्षारोपण कार्यक्रमास ओंकार नाईक, शैलेश राईलकर, रविंद्र पाटील,माधुरी टेकाळकर,स्वराज नाईक, नैनेश नाईक, अतुल गुरव, राकेश काठे, आदीच्या सहकार्याने अंदाजे 1500 बिया उपलब्ध करण्यात आल्या होत्या, यामध्ये चिंच, आंबा, फणस, कोकम, कंरज, मोह व आणखीन इतर बियाचा समावेश होता. या वृक्षारोपण कार्यक्रमांस सकाळी दहा वाजता सुरूवात करण्यात आली. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व युवावर्गाने श्रमदानातून ठिकठिकाणी खड्डे करून बीज वृक्षारोपण केले.
चौल भाटगल्‍ली डोंगर परिसरात करण्यात आलेल्या बीज वृक्षारोपणचे योग्य प्रकारे संगोपन निसर्ग संस्थेच्या माध्यमातून करण्यात येईल असे राकेश काठे यांनी म्हटले, यावेळी त्यानी सहभागी निसर्ग सोशल ग्रुप सदस्य, युवावर्ग व विविध संस्थेचे विशेष आभार व्यक्‍त केले.
निसर्ग सोशल ग्रुप संस्थेच्या माध्यमातून गेले काही वर्ष चौल व परिसरात सामाजीक बांधिलकीची विविध कामे स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहेत यामध्ये चौल भोवाळे यात्रेत स्वच्छता मोहिम, प्रतिवर्षी वृक्षारोपण, निसर्गातील पशु पक्षी यांना संकटकाळात मदत व सरक्षंण, डोंगरातील अकस्मात लागलेल्या आगी रोखण्यासाठी श्रमदान, आदी विविधा स्तुत्य उपक्रम राबविले जातात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *