ताज्याघडामोडीरोहा

विकास कामाना प्राधान्य, व कामासाठी थेट भेटा – आम. महेंद्रशेठ दळवीची चोरढे विभाग पक्षप्रवेश कार्यकर्त्याना ग्वाही

चोरढे विभागात दसराच्या मुर्हूताने राजकीय सिमोल्‍लंघन,
शिवसेना शिंदे गटात राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस मुरूड तालुका ओबीसी सेल अध्यक्ष अनिल चोरढेकर यांचेसह
चोरढे,ताडवाडी,ताडगाव, सावरोली तळेखार रा.कॉ.कार्यकर्त्याचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
शिवसेना शिंदे गटाचे निलेश घाटवळ यांच्या प्रयत्नातून पक्ष प्रवेश

रेवदंडा-महेंद्र खैरे- विकासा कामाना प्राधान्य निश्‍चित दिले जाणार असून कोणत्याही कामासाठी थेट भेटा अशी ग्वाही अलिबाग-रोहा-मुरूड विधानसभा मतदार संघाचे आम. महेंद्रशेठ दळवी यांनी चोरढे विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश कार्यक्रमात केला.
आम.महेंद्रशेठ दळवी यांचे अलिबाग चाळमळा येथील निवासस्थानी कार्यालयात दि. 4 ऑक्टोबर रोजी दुपारी एकचे सुमारास चोरढे विभाग राष्ट्रवादी कॉग्रेसचे मुरूड तालुका ओबीसी सेल अध्यक्ष अनिल चोरढेकर यांचेसह चोरढे, ताडवाडी, ताडगाव, सावरोली व तळेखार विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते व आम. महेंद्रशेठ दळवी यांचे निकटवर्गिय निलेश घाटवळ यांच्या प्रयत्नातून दसराच्या मुर्हूतावर राजकीय सिमोल्‍लघनाने पक्ष प्रवेश कार्यक्रम घडून आला.
या कार्यक्रमास चोरढे विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस मुरूड तालुका ओबीसी सेल अध्यक्ष अनिल चोरढेकर, तळेखार ग्रा.प.राष्ट्रवादी कॉग्रेसचे माजी सरपंच धर्मा नामदेव पाटील, चोरढे विभागातील ग्रा.प.माजी सदस्य दिपक महाडिक, तसेच कार्यकर्ते बाळाराम शेडगे, तेजस शेडगे, परशुराम काजारे,भारतभाऊ चोरढेकर, मंगेश गुंड, बाळाराम गुंड, लखन शेडगे, विलास पाटील, विजय काजारे, रमेश चोरढेकर, किसन चोरढेकर, रविंद्र भोपी, गणपत सातामकर, कामेश डोलकर, संतोष दुकले, कैलास पाटील, हरिश्ंचंद्र शेडगे, रमेश शेडगे, हिराबाई चोरढेकर, तुलसा शेडगे, हरेश घाग, सदानंद घाग, दिवेश चोरढेकर, योगेश दुकले, शरद पंची, महादेव चोरढेकर, प्रशाांत दुकले, मनोहर भोईर,तसेच ताडवाडीचे ताडवाडी गाव अध्यक्ष वसंत शेडगे, रामा पाटील, गोविंद पाटील, मुकूंद पवार, सावरोली गावाचे महादेव बाळया महाडिक, नागोजी महाडिक, रामा शेडगे, किसन कर्णेकर, शंकर सुभेदार, महादेव ठाकूर, तळेखार गावाचे दत्‍ताराम काटकर, हरिश्च्रंद्र ठाकूर, रामदास ठाकूर, सुरेश भोईर, जनार्दन शिंदे,आदीने शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश घेतला, आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी त्यांचे स्वागत केले.
यावेळी शिवसेना शिंदेगट जिल्हा प्रमुख राजा केणी, उपजिल्हा प्रमुख भरतशेठ बेलोशे, पक्षप्रवेश कार्यक्रमाचे सर्वोसुवा निलेश घाटवळ, मुरूड तालुका प्रमुख ॠषीकांत डोंगरीकर, मुरूड तालुका संघटक यशवंत पाटील, मुरूड उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील, सतेज पाटील, मुरूड युवा सेना प्रमुख अमोल लाड, आदी मुरूड तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
रा.कॉ.चे मुरूड तालुका ओबिसी सेल अध्यक्ष अनिल चोरढेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन समर्थक कार्यकर्त्यासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकास कामे शहरी भागात राबवित असून ग्रामीण भागात पुर्णतः दुर्लक्ष करत असल्याने चोरढा परिसरात विकास कामे होत नसल्याचा आरोप केला.
आम.महेंद्रशेठ दळवी यांनी उपस्थित पक्ष प्रवेश कर्त्याशीं वार्तालाप साधताना, त्यांच्या राजकीय प्रवास सांगून विविध राजकीय संघर्षाची माहिती दिली. तसेच पक्ष प्रवेश कार्यकर्त्याना विकासा कामासाठी निश्‍चित प्राधान्य दिले जाईल असे सांगून कोणत्याही कामासाठी थेट भेटा अशी ग्वाही दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुरूड उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *