वाडगाव ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न
वाडगाव ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न
रेवदंडा-महेंद्र खैरे- वाडगाव ग्रामपंचायत आदिवासी वाडीवर अलिबाग तहसील कार्यालय तर्फे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जेष्ठ पत्रकार रायगड भूषण जयपाल पाटील हे होते, तर प्रमुख पाहुणे अलिबाग मंडळ अधिकारी राम मांढरे उपस्थित होते. प्रारंभी ग्रामपंचायत सरपंच सरिता भगत,उपसरपंच नीलम नाईक जयेंद्र भगत माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य, सदस्य प्रसाद पाटील,शुभांगी भगत, प्रमिला फुले यांनी सर्वांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.व्यासपीठावर माजी सरपंच सिताराम भगत सानप तलाठी वर्सोली , ललिता शिर्के तलाठी, सदस्य सजना विठू नाईक, माजी सरपंच गणपत पवार, नरेश थळे, नथू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला जयेंद्र भगत यांनी प्रास्ताविक केले व कार्यक्रमाबद्दल माहिती दिली. शासन आपल्या दारी याबद्दलची माहिती. तलाठी ललिता शिर्के यांनी दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रायगड भुषण जयपाल पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की आपण सर्व आदिवासी महिला गावापासून कामासाठी व खरेदीसाठी शहरांमध्ये जाता अशावेळी तुमच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस दलाचा 112 क्रमांकाचा वापर करावा.रस्त्यावरील घरा कडे जाताना अपघात प्रसंगी मदतीला 108 रुग्णवाहिका, गावातील महिलांना बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी. 102 क्रमांक ची रुग्णवाहिकेचा वापर कसा करावा.याची माहिती दिली.तर जनतेच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी ही योजना राबविली आहे त्याबद्दल त्यांचे जिल्हाधिकारी रायगड व तहसीलदार यांचे आभार त्यांनी मानलेयावेळी जातीचे दाखले, रेशन कार्ड वर घरातील सदस्यांची नावे वाढविणे, फाटलेले रेशन कार्ड बदल करून देणे, इत्यादी कामे येथे करण्यात आली. याचवेळी आदिवासी वाडीसाठी शासनाच्या समाज कल्याण खात्याने मंडप डेकोरेशन, १००खुर्च्या, रेडिओ संच भेट देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश कडू यांनी केले. या शिबिराचा 80 आदिवासी ग्रामस्थांनी लाभ घेतला.कार्यक्रम यशस्वी करण्यास तलाठी ललिता शिर्के व कोतवाल रुपेश म्हात्रे यांनी खूप मेहनत घेतली.