अहोरात्र जनसेवा,,,, व अन्याया विरोधात संघर्ष बोर्ली येथे मानसीताई दळवी यांचे विरोधक टिकाकारांना सडेतोड प्रतिउत्तर
अहोरात्र जनसेवा,,,, व अन्याया विरोधात संघर्ष बोर्ली येथे मानसीताई दळवी यांचे विरोधक टिकाकारांना सडेतोड प्रतिउत्तर
रेवदंडा-महेंद्र खैरे- मागील राजकीय क्षेत्रात घडून आलेल्या घटनांच्या आठवणीना उजाला देत आम. महेंद्रशेठ दळवी यांनी अहोरात्र जनसेवा,,,, व अन्याया विरोधात सातत्याने संघर्ष केला असल्याचे माजी जि.प. प्रतोद मानसीताई दळवी यांनी सांगून विरोधक टिकाकारांना प्रत्येक टिकेला ठोस प्रतिउत्तार बोर्ली येथे बापुजी मंदिर सभागृह भुमिपुजन प्रसंगी उपस्थितांना संबोधीताना केले.
यावेळी संबोधीातना मानसीताई दळवी यांनी शेकापक्षात अनेक वर्ष काम केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल झालो, परंतू प्रत्येक पक्षात प्रामाणीक पणे काम केले, संघटनेसाठी काम केले, त्यावेळी कोणतेही अप्रामाणीक काम केले नाही. मात्र असे असताना सुध्दा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी संधी दिली गेली नाही, एकप्रकारे पक्षाच्या नेत्याकडून अन्याय केला गेला, या अन्यायानेच पक्ष बदलावे लागले, असे स्पष्टीकरण देत विरोधकाच्या पक्ष बदलू, व दल बदलू या आरोपाचे खंडन त्यांनी केले.
तर राज्यात सत्ता असून सुध्दा आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी सादर केलेले विकास कामाच्या आराखडास मंजूरी मिळत नव्हती, अनेक विकास कामे रेगांळली होती, पुढील निवडणूकीत मतदारांना सामोरे कसे जायचे, हा प्रश्न उपस्थित होत होता, राज्यातील विकास निधी राष्ट्रवादी काँग्रेसकडे जास्तीत जास्त दिला जात होता. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना पांठिबा दयावा लागला, आणी मतदार संघाच्या विकासासाठी तसे करणे गरजेचे होते असे सांगून त्यांनी आम. महेंद्रशेठ दळवी यांनी गद्दार केली या विरोधकांच्या टिकेला प्रतिउत्तर दिले.
आम. महेंद्रशेठ दळवी हे अहोरात्र जनसेवेत असतात, व त्यांना सातत्याने अन्यायाचे विरोधात संघर्ष करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेकापक्षाच्या चित्रलेखा पाटील सायकल वाटप कसे करतात, यांची माहिती देताना सांगितले, की विविध कंपनीच्या सिएसआर फंड निधीतून सायकल वाटप केले जात आहे, मात्र या सायकलचे वाटप करताना सायकल साठी ज्यांनी पुरस्कृत केले त्यांचे नाव दिले जात नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
बोर्ली येथे पंचकुम समाजाचे वतीने बापुजी मंदिर सभागृह भुमिपुजन कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माजी जि.प.प्रतोद मानसीताई दळवी यांची प्रमुख उपस्थितीसह शिंदे गट महिला जिल्हा संघटक शुभांगी करडे, शिंदे गट मुरूड तालुका प्रमुख ॠषीकांत डोंगरीकर, निलेश घाटवळ, उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील, माजी सभापती निता घाटवळ, बोर्ली शाखा प्रमुख राजू भोईर, माजी शाखा प्रमुख भारत मोती, तालुका उपसंघटक स्वप्नील नाखवा, सतेज ठाकूर, शैलेश रातवडकर, इम्तीयाज दळवी, युवा अधिकारी संदेश सौ. हसवारे,आदी मान्यवराची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन पंचकुम समाज अध्यक्ष पप्पुशेठ शिंदे, उपाध्यक्ष अजय पोवार, सचिव दत्तात्रेय तांबडे, अनंता चौलकर, सदस्य प्रताप नलावडे, महेश नेवरेकर, जनार्दन कमाने, आशिष नागवेकर,दत्तात्रेय बारवेकर आदीसह समाज ग्रामस्थ व भगिनी यांची उपस्थिती होती. या सभागृहाचे नुतनीकरणासाठी आम. महेंद्रशेठ दळवी यांनी डोंगरी विकास निधी अंतर्गत आमदार निधीतून पंधरा लाख रूपये निधी मंजूर केला आहे. बोर्ली येथील पंचकुम समाज अध्यक्ष पप्पुशेठ शिंदे यांचे प्रयत्नाने व माजी शाखाप्रमुख भारत मोती यांचे सहकार्याने आम. महेंद्रशेठ दळवी यांच्या आमदार निधीतून बापुजी मंदिर सभागृहाचे नुतनीकरण करण्यात येत आहे.
बापुजी मंदिर सभागृह नुतनीकरण भुमिपुजन प्रमुख अतिथी मानसीताई दळवी, व आप्पा कमाने यांचे हस्ते तर कामाचा शुभारंभ तालुका अध्यक्ष ॠषीकांत डोंगरीकर यांनी कुदल मारून केला. तत्पुर्वी पंचकुल समाजाचे वतीने मानसीताई दळवी व अन्य मान्यवरांचे स्वागत फटाक्याचे आतषबाजीने केला, यावेळी मानसीताई दळवी यांचे हस्ते बापुजी मंदिरात पुजाअर्चा करण्यात येऊन पुढील कार्यक्रमांस सुरूवात करण्यात आली, पंचकुम समाजाचे वतीने अध्यक्ष पप्पुशेठ शिंदे यांनी मानसीताई दळवी यांच्या सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून केला, यावेळी पंचकुल समाजाचे वतीने उपस्थित मान्यवराचा सुध्दा शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील यांनी केले.