जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे रेवदंडा निवासस्थानी सदिच्छा भेट
खासदार सुप्रियाताई सुळे यांनी घेतले जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशिर्वाद
रेवदंडा-महेंद्र खैरे- राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार याच्या कन्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे रेवदंडा निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन आशिर्वाद घेतले यावेळी त्यांचे समवेत रायगडचे खासदार सुनिल तटकरे उपस्थित होते.
खासदार सुप्रियाताई सुळे यांचे खासदार सुनिल तटकरे यांचेसह रेवदंडा येथे जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे रेवदंडा निवासस्थानी दुपारी साडेबाराचे सुमारास आगमन झाले, यावेळी जेष्ठ निरूपणकार डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी,निरूपणकार सचिनदादा धर्माधिकारी, राहूलदादा धर्माधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.
प्रारंभी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी व निरूपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांना शाल व पुष्पगूच्छ प्रदान केले. यावेळी जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सुध्दा खासदार सुप्रियाताई सुळे यांना पुष्पगूच्छ देऊन स्वागत केले, तसेच खासदार सुनिल तटकरे यांना निरूपणकार सचिनदादा धर्माधिकारी यांना पुष्पगूच्छ प्रदान केले. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे यांनी अंदाजे एक तास जेष्ठ निरूपणकार पद्मश्री डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचेशी संवाद साधला, त्यानंतर खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जेष्ठ निरूपणकार डाँ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे शुभ आशिर्वाद घेऊन अलिबागहून मुंबईकडे प्रस्थान केले. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा चिटणीस आशिष भट, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा संघटक ॠषीकांत भगत, तसेच रा.कॉ. अलिबाग-मुरूड-रोहा विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अमित नाईक व सहकारी यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा चिटणीस आशिष भट व जिल्हा संघटक ॠषिकांत भगत यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पुष्पगूच्छ प्रदान करून स्वागत केले.