ताज्याघडामोडी

शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना अपघात न होण्यासाठी कायम सहकार्य करा= जयपाल पाटील

रेवदंडा-महेंद्र खैरे-रहदारीच्या हम रस्त्यावरून शाळेत जाणाऱ्या मुलांना रस्ता ओलांडताना गावातील तरुण-तरुणी व नागरिकांनी रस्त्यावरील दोन्ही बाजूंच्या वाहतुकीस हात वर करून थांबवून शालेय मुलांना रस्ता ओलांडण्यास कायम मदत करून आपल्या गावात अपघात कसा होणार नाही असा गावासाठी संकल्प करावा असे मार्गदर्शन कुरूळ ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत रायगड भूषण जयपाल पाटील यांनी सांगितले. व्यासपीठावर कुरळ सरपंच सौ स्वाती पाटील रायगड भूषण जयपाल पाटील आपत्ती व्यवस्थापन तज्ञ,ग्रामविकास अधिकारी श्रीहरी खरात ,माजी सरपंच तथा सदस्य मनोज ओव्हाळ,सदस्य भूषण बिरजॊ, सदस्य वृषाली पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष रवी मगर,अलिबाग ब्रह्माकुमारी केंद्रप्रमुख भारती दीदी व अंजू दीदी मान्यवर उपस्थित होते.सुरुवातीस महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करण्यात येऊन दीप प्रज्वलन करण्यात आले. सरपंच यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी शाळेतील मुला-मुलींना हम रस्ता कसा एकमेकांच्या मदतीने हात धरून येण्याचे प्रात्यक्षिक दाखवून अपघात घराशेजारी शाळेसमोर रस्त्याने जाता येता झाला तर 108 रुग्णवाहिकेला कसे बोलवायचे यासाठी फोन करतात, पायलट धर्मा शेंडे हे डॉक्टर जयप्रकाश पांडे व डॉक्टर काझी यांना घेऊन पोहोचले. यावेळी डॉक्टर काझी यांनी 108 रुग्णवाहिकेबद्दल माहिती दिली. यानंतर जयपाल पाटील यांनी घरातील गॅस सिलेंडर, विजेची उपकरणे, तलावात पोहताना सोबत कोणीतरी असल्याशिवाय होण्यास उतरू नये, साप व विंचू दंश झाल्यावर काय करावे याचे प्रात्यक्षिक,महिलांनी कायम घरामध्ये चप्पल वापरावी,तसेच आपल्या सुरक्षेसाठी पोलिसांचा 112 क्रमांकाचा वापर करावा असे सांगितले.एका अपघात प्रसंगी रात्री आठ वाजता कुरुळच्या पोलीस पाटील अर्चना करंबत गायकवाडयांनी मदत केल्याबद्दल प्रमुख पाहुणे भारतीय दीदी यांच्या हस्ते शाल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्याचवेळी मुला-मुलींना अंजू दीदी यांनी आपले मन कायम शांत ठेवावे, गुरुजन व वडीलधाऱ्यांचा आदर करावा व आनंदी गोष्टी सांगितल्या.याच वेळी जिल्हा परिषदेच्या जेवण करण्याच्या खोलीच्या बाजूच्या लाकडांना व गवताला आग लागल्यामुळे जयपाल पाटील यांनी आरसीएफ थळ कंपनीत वरिष्ठ अधिकारी सुजित भोयर यांना फोन करताच २०सावा मिनिटाला अग्निशमन अधिकारी पी,जी, प्रशांत यांचे सहकारी हनीफ कुरेशी, नीरज खोत, हरिश्चंद्र बानकर,तुषार कवळे अजित कांबळे यांनी येऊन. आग विझवली. सोबत मुलांना आणि ग्रामस्थांना आज भिजवण्याचे इतर साहित्यांची माहिती अधिकारी प्रशांत यांनी दिली.अशी आपल्या गावात शेजारी आग लागली तर आरसीएफ कंपनीच्या आगीच्या बंबाला बोलवावे असे जयपाल पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमास सुधागड एज्युकेशन शाळेचे विद्यार्थी, रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, प्रणय पाटील गुरुजी,आपत्ती व सुरक्षा मित्र सुरेश खडपे,सचिन पाटील अभिजीत घाडगे ग्रामपंचायतचे कर्मचारी वृंद, ग्रामस्थ असे 200 जण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास पाटील मुख्याध्यापक यांनी केले आभार प्रदर्शन केळकर मॅडम यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *