ताज्याघडामोडीरेवदंडा

बोर्ली येथे मुस्लिम मोहल्‍लात पेव्हरब्लॉक रस्ता आम. महेंद्रशेठ दळवीच्या प्रयत्नातून

मानसीताई दळवी यांचे हस्ते भुमिपुजन,मुफीद दळवी यांची मागणी व भारत मोती यांचा पाठपुरावा


रेवदंडा-महेंद्र खैरे- बोर्ली येथे मुस्लिम मोहल्‍लात पेव्हरब्लॉक रस्ताचे कामाचे भुमिपुजन कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.
बोर्ली येथील माजी सरपंच बापू दळवी यांचा मुलगा मुफिक दळवी यांच्या मागणीने आमदार महेंद्रशेठ दळवी समर्थक शिंदे गटातील भारत मोती यांच्या पाठपुरावाने व आम. महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रयन्ताने अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत व पायाभुत सुविधा अंतर्गत बोर्ली येथील मुस्लिम मोहल्‍लातील पेव्हरब्लॉक रस्त्यास दहा लाख रूपयांच्या निधी उपलब्ध करण्यात आला आहे, या मुस्लिम मोहल्‍ला पेव्हरब्लॉक रस्ताचे कामाचे भुमिपुजन माजी जि.प. प्रतोद मानसीताई दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
यावेळी बाळासाहेबाची शिवसेना-शिंदे गटाचे आम.महेंद्रशेठ दळवी समर्थक मुरूड तालुका अध्यक्ष ॠषीकांत डोंगरीकर, उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील, महिला जिल्हा संघटक शुभांगी करडे, भारत मोती, शाखा प्रमुख राजू भोईर, झिनत हसवारे, यांचेसह माजी सरपंच बापु दळवी, मुफीद दळवी, इम्तीयाज दळवी,यासीन दळवी, फोटोग्राफर बाबू छापेकर, समद नाईक,राजू दळवी, रियाज हलडे, मुस्लिम समाज अध्यक्ष इक्बाल दळवी,जावेद पठाण,अ
आदी मुस्लिम समाज बांधव यांची उपस्थिती होती.
यावेळी बोर्ली मुस्लिम समाजाचे वतीने माजी सरपंच बापू दळवी यांचा मुलगा मुफिक दळवी यांनी माजी जि.प. प्रतोद मानसीताई दळवी यांना पुष्पगुच्छ प्रदान करून मानसन्मान केला. मुफीद दळवी यांनी या मुस्लिम मोहल्‍ला पेव्हरब्लॉक बसविण्यासाठी आम. महेंद्रशेठ दळवी यांचेकडे मागणी केली होती. तर उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील, यांनी आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी बोर्ली मुस्लिम समाज बांधवाना दिलेला शब्दाची पुर्ती या कामातून केली असल्याचे सांगीतले. यावेळी मुस्लिम समाज बांधवाना बोर्ली येथील समाज सभागृहाचे नुतनीकरणाचे काम पुर्ण करण्याची मागणी बोर्ली मुस्लिम समाजाचे वतीने मानसीताई दळवी यांना करण्यात आली असून लवकरच निधी उपलब्ध करून मुस्लिम समाज सभागृहाचे काम पुर्ण करण्याचे आश्‍वासन मानसीताई दळवी यांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *