रेवदंडा येथील राज्यस्तरीय मायनाक भंडारी चषक टेनिस क्रिकेट स्पर्धेत स्पृहा ११ किहीम पुरस्कृत भंडारी फायटर्स श्रीवर्धन प्रथम विजेता.
भंडारी बहुउद्देशिय सामाजिक संस्था, अलिबाग आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दिमाखात संपन्न..
रेवदंडा-महेंद्र खैरे-भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अलिबागच्या वतीने राज्यस्तरीय ”मायनाक भंडारी चषक २०२३ ”पर्व २” या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदरील स्पर्धा अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील हरेश्वर क्रिकेट मैदानाच्या भव्य पटांगणावर ७ जानेवारी ते ८ जानेवारी २०२३ दरम्यान संपन्न झाली.अंतिम सामना “स्पृहा ११ किहीम पुरस्कृत भंडारी फायटर्स श्रीवर्धन” व “भंडारी योद्धा जय हनुमान कातळपाडा” यामध्ये खेळविण्यात आला, यात “स्पृहा ११ किहीम पुरस्कृत भंडारी फायटर्स श्रीवर्धन” हां संघ अजिंक्य ठरला.
सदर स्पर्धेमध्ये एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवला व राज्यातील १६० खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत चार संघ पात्र ठरले. “भंडारी योद्धा जय हनुमान कातळपाडा” विरूद्ध “भंडारी टायगर्स चौल रेवदंडा” यामध्ये प्रथम उपांत्य फेरीचा सामना खेळविण्यात आला. यामध्ये “भंडारी योद्धा जय हनुमान कातळपाडा” विजयी होऊन अंतिम सामन्यासाठी पात्र झाला तर दुसरा उपांत्य सामना “स्पृहा ११ किहीम पुरस्कृत भंडारी फायटर श्रीवर्धन” विरूद्ध “अंश मयेकर ४४४४” यांच्यामध्ये रंगला. त्यात “स्पृहा ११ किहीम पुरस्कृत भंडारी फायटर श्रीवर्धन” ह्या संघाने विजयी होऊन अंतिम सामन्यात प्रवेश केला.या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थात मालिकावीर म्हणून “स्पृहा ११ किहीम” पुरस्कृत “भंडारी फायटर” श्रीवर्धन संघाचा पराग खोत तर उत्कृष्ट फलंदाज “भंडारी टायगर” चौल रेवदंडा संघाचा आकाश तवसाळकर, उत्कृष्ट गोलंदाज “भंडारी योध्दा” जय हनुमान कातळपाडा संघाचा अमित पारकर यांची निवड करण्यात आली.स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक १,००,०००/- रूपये अलिबागमधील उद्योगपती, दानशूर व्यक्तीमत्व श्री.राजनभाई नार्वेकर यांनी दिले..
द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ५०,०००/- रूपये मुरबाड नगर पंचायतीचे विद्यमान नगरसेवक श्री. विनोदशेठ नार्वेकर यांनी दिले..तृतीय क्रमांकाचे पारितोषिक २५०००/- रूपये नागाव नगरीचे माजी सरपंच श्री. नंदकुमार मयेकर यांनी दिले..स्पर्धेतील मालिकाविरासाठी असलेले वॉशिंग मशीन चे बक्षिस रायगड लिफ्टचे मालक श्री.प्रशांत चिंबुलकर यांनी दिले..स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय, क्रमांकाची आकर्षक चषकं कै. प्राची रमेश पाटील ह्यांच्या स्मरणार्थ सौ. समिहा साहिल पाटील यांच्याकडून देण्यात आली.सदर स्पर्धेसाठी विविध मान्यवरांनी भेट दिली, यात ज्येष्ठ गुरुवर्य नाना तोडणकर गुरुजी, उद्योगपती राजनभाई नार्वेकर, नागावचे माजी सरपंच नंदकुमारशेठ मयेकर, अलिबाग कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री.रमेशदादा पाटील, ग्रुप ग्रामपंचायत नागावचे विद्यमान सरपंच श्री.निखिल मयेकर, सातिर्जेचे माजी उपसरपंच महेश नार्वेकर, श्री. नितिन नार्वेकर, श्री व सौ रूमडे, श्री. प्रकाश पारकर, सौ.क्रांती जाधव,अलिबाग पंचायत समिती सदस्या सौ.समिहा पाटील, सौ.अल्काताई, श्री.अविनाश मसुरकर, श्री.भास्कर चव्हाण, श्री.मोहन खोत, श्री. शिवप्रसाद तोडणकर, श्री.संतोष किर, श्री.रोहन तोडणकर, श्री. पिटनाईक, श्री.संतोष मोरे, ग्रुप ग्रामपंचायत रेवदंडा उपसरपंच श्री.राजन वाडकर, श्री.प्रफुल्ल मोरे, श्री.विलास शिवलकर, पनवेल तालुका भंडारी मंडळाचे अध्यक्ष श्री.दिपक खोत, खंडाळा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री. संतोष कनगुटकर, श्रीवर्धन तालुका भंडारी समाज अध्यक्ष श्री.संजय मांजरेकर, श्री.राजुदादा शिंदे, सासवणें ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजू शिलधनकर, भंडारी समाज हितवर्धक मंडळ चौल रेवदंड्याचे अध्यक्ष श्री.सुरेश खोत, उपाध्यक्ष प्रशांत जाधव, श्री.संदीप खोत इत्यादी मान्यवरांनी स्पर्धेला उपस्थिती लावली..''राज्यस्तरीय मायनाक भंडारी चषक'' पर्व २ क्रिकेट स्पर्धेसाठी संस्थेचे अध्यक्ष दर्शन पारकर, सचिव अक्षय गुळेकर, उपाध्यक्ष अश्विनकुमार पाटील, खजिनदार प्रशांत चिंबुलकर, कार्यकारणी सदस्य साईल पाटील, विलास आंब्रे, सचिन कदम यांच्यासह भंडारी समाज हितवर्धक मंडळ रेवदंडा चौलचे अध्यक्ष श्री.सुरेश खोत, उपाध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी सदस्यांनी मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली.भंडारी समाजातील ज्येष्ठ, तरुण, लहान मोठ्यांनी देणगी स्वरूपात पाठबळ दिल्यानंतर प्रत्यक्ष मैदानातही उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह द्विगुणित केला. या स्पर्धेचा मुख्य उद्देश भंडारी समाजाच्या क्रिकेट खेळाडूंना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, त्यांना क्रिकेट खेळायला प्रोत्साहित करणे, प्रशिक्षित करणे व त्यांना विविध स्पर्धांमध्ये सहभागी करून घेण्यासाठी या स्पर्धेचे नियोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचं tenniscricket.in च्या माध्यमातून लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले.मायनाक भंडारी चषक" क्रिकेट स्पर्धेचे पर्व ३ रे आणखीनच बहारदार असेल असे संस्थापक अध्यक्ष दर्शन प्रकाश पारकर यांनी सांगितले