महत्वाच्या बातम्यारेवदंडा

राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने शिक्षकांचे ज्वलंत प्रश्‍न सोडविले- राज्याध्यक्ष राजेश सुर्वे

प्राथमिक शिक्षक परिषदेच्या मुरूड तालुका अध्यक्षपदी राजेंद्र नाईक


उपाध्यक्षपदी चेतन चव्हाण, कार्याध्यक्षपदी भास्कर साळावकर,

रेवदंडा-महेंद्र खैरे-महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेची नुतन मुरूड तालुका कार्यकारणी अध्यक्षपदी चोरढा मराठी शाळेचे शिक्षक राजेंद्र नाईक यांची एकमताने निवड झाली असून उपाध्यक्षपदी चेतन चव्हाण, कार्याध्यक्षपदी भास्कर साळावकर, संघटनमंत्री देवानंद गोगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी राज्याअध्यक्ष राजेश सुर्वे यांनी राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचा संघर्षमय प्रवास, कार्य, यांची संपुर्ण माहिती देत, राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने शिक्षकांचे ज्वलंत प्रश्‍न सोडविले असे म्हटले.
मुरूड तालुका प्राथमिक शिक्षक कार्यकारणी निवड सभा मांडळा राजिप शाळेत दि. शनिवार दि. 15 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेअकराचे सुमारास घेण्यात आली, यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांचेसह जितेंद्र बोंडके यांच्या प्रमुख उपस्थितीसह मुरूड तालुक्यातील 50 प्राथमिक शिक्षकांची उपस्थिती होती. मुरूड तालुका प्राथमिक शिक्षक कार्यकारणी निवड राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. व्यासपिठावर राजेंद्र नाईक, भास्कर साळावकर, देवानंद गोगर आदी उपस्थित होते. प्रांरभी प्रमुख अतिथी राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे व जितेंद्र बोडके यांचे हस्ते सरस्वतीपुजन,दिपप्रज्वलनाने कार्यकारणी निवड प्रकियेस सुरूवात करण्यात आली. तत्पुर्वी प्रास्ताविकेत राजेंद्र नाईक यांनी प्रारंभी संघटनेने केलेल्या विविध कामाची माहिती विषद केली,यामध्ये एम.एस.सी.आय.टी स्थगित, शिक्षक सेवा सातत्य ,पोषण आहार लेखा परिक्षण स्थगिती, कोविड काळात गरजूंना केलेली मदत इत्यांर्दी माहिती दिली.
यानंतर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेची नुतन मुरूड तालुका कार्यकारणी निवड प्रक्रियेस सुरूवात करण्यात आली. मुरूड तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेच्या तालुका अध्यक्षपदी राजेंद्र नाईक, उपाध्यक्ष-चेतन चव्हाण,कार्याध्यक्ष-भास्कर साळावकर, कोषाध्यक्ष-शरद पाटील, सचिव-जगदीश चवरकर, संघटनमंत्री – देवानंद गोगर,प्रसिध्दी प्रमुख- राजेंद्र साळावकर, महिला प्रतिनिधी रेश्मा धुमाळ, सिमा नागावकर,रूपाली वाजंत्री, प्राजक्‍ता पाटील, केंद्र प्रतिनिधी वळके केंद्र-हेमंत म्हात्रे, मांडळा केंद्र प्रतिनिधी-अभिजीत लाड, बोर्ली केंद्र प्रतिनिधी- गणेश कमळनाखवा,नादगांव केंद्र प्रतिनिधी-राजेंद्र बुल्‍लू,आंगरदांडा केंद्र प्रतिनिधी-बालाजी वडवले, उर्दु प्रतिनिधी- इर्षाद बैरागदार यांची निवड उपस्थित प्राथमिक शिक्षकामधून बिनविरोध व एकमताने करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचा संघर्षमय प्रवास, कार्य, यांची संपुर्ण माहिती देत, राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने शिक्षकांचे ज्वलंत प्रश्‍न सोडविल्याचे सांगितले तसेच शिक्षक परिषदेने केलेली विविध कामे, शिक्षक परिषदेची मुर्हूतमेढ, शिक्षकासाठी शिक्षक परिषद राबवित असलेले विविध उपक्रम, व शिक्षक परिषदेच्या पुढील कालावधीतील योजना यांची सुध्दा माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेची नुतन मुरूड तालुका कार्यकारणी निवड प्रक्रियेत सुत्रसंचलन जगदीश चवरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार शरद पाटील यांनी व्यक्‍त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *