ताज्याघडामोडी

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही- जिल्हा अध्यक्ष आम. प्रशांतदादा ठाकूर

रेवदंडा-महेंद्र खैरे- मे. गेल इंडिया लि. उसर या कंपनीच्या उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेच्या वतीने विविध मागण्या प्रशासन व कंपनी व्यवस्थापन यांचेकडे केल्या आहेत, या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन भाजपचे आम. प्रशांतदादा ठाकूर यांनी उसर प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेस मार्गदर्शन करताना म्हटले.
खानाव ग्रा.प. अंतर्गत नाईक कुणे येथील मंदिरात उसर, कुणे, घोटवडे, नाईक कुणे, व मल्याण या प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेस मार्गदर्शन सभेचे आयोजन येथील मंदिरात रविवार दि. 13 नोव्हेबर राजी दुपारी अकरा वाजता करण्यात आले होते. या प्रसंगी भाजप जिल्हा अध्यक्ष आम. प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थितीसह जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, भाजप अलिबाग तालुका प्रमुख परशुराम म्हात्रे,सरचिटणीस संतोष पाटील, भाजप मुरूड तालुका प्रमुख महेंद्र चौलकर, प.स.सदस्य उदय काठे, अँड संतोष पवार, अलिबाग भाजप शहर प्रमुख अँड अंकित बंगेरा, सोपान जांभेेकर, कृष्णा कोबनाक, शरद थळे, सुजित गांवड, जान्हवी पारेख, पंकज अंजारा, शैलेश नाईक, निखिल चव्हाण, लतिकेश भोईर, समिर नाईक आदी मान्यवराची उपस्थिती होती. मे. गेल इंडिया लि. उसर या कंपनीच्या उसर, कुणे,घोटवडे, नाईक कुणे, मल्याण, ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेस भाजप आम. प्रशांतदादा ठाकूर यांनी संवाद साधला, प्रकल्पग्रस्तांवर होणार्‍या अन्याया विरोधात व निषेधार्थ न्याय हक्‍क प्राप्त करण्यासाठी दि. 21 नोव्हेबर 2022 रोजी गेल इंडिया लि. उसर यांचे गेट समोर काम बंद आंदोलनाचा इशारा ंपनीच्या उसर, कुणे,घोटवडे, नाईक कुणे, मल्याण, ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे, याबाबत जिल्हाधिकारी रायगड व गेल इंडिया लि. उसर व्यवस्थापनास निवेदन दिले आहे. प्रकल्पग्रस्तावर कंपनी व्यवस्थापन करत असलेल्या अन्यायाचा या निवेदनात उल्‍लेख केला आहे, तसेच विविध मागण्या सुध्दा कंपनी व्यवस्थापनाकडे केल्या आहेत. या आंदोलनास भाजपचे जिल्हा अध्यक्ष आम. प्रशांतदादा ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.
त्यानुसार या आंदोलनाचे निमित्‍ताने आम. प्रशांतदादा ठाकूर यांनी नाईक कुणे येथे प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेस मार्गदर्शन केले, तत्पुर्वी कंपनी व्यवस्थापन व स्थानिक नेते मंडळीकडून होत असलेल्या विविध अन्यायाबाबत या संघटनेच्या वतीने आम. प्रशांतदादा ठाकूर यांना माहिती संघटनेच्या सदस्यांनी दिली. यावेळी मार्गदर्शन करताना मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन भाजप जिल्हा अध्यख आम. प्रशांतदादा ठाकूर यांनी केले.
उसर, कुणे, घोटवडे, नाईक कुणे, व मल्याण या प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेच्या वतीने अध्यक्ष नरेश गोपाळ ठाकूर, उपाध्यक्ष दत्‍तात्रेय रामा ठाकूर, कार्याध्यक्ष अनंत गोपाळ शिंदे, सेके्रटरी सुरेश केशव धसाडे, खजिनदार गिरीष विनायक पाटील तसेच सदस्य व सल्‍लागार निलेश जयराम गायकर, आदीने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुरूवातीस आम. प्रशांतदादा ठाकूर व उपस्थित मान्यवर यांचे स्वागत प्रकल्पग्रस्त शेतमजूर संघटनेच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *