आंबेपुर येथे पिक पहाणी कार्यक्रम
अंकुर सिड्स च्या स्तुत्य उपक्रमाने
रेवदंडा-महेंद्र खैरे- आंबेपुर येथे पिक पहाणी कार्यक्रम शेतकरी व विक्रेते यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, नागपुरच्या अंकुर सिड्स कंपनीच्या स्तुत्य उपक्रमाने भाताचे श्री 101 या वाणाची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली.
आंबेपुर येथे राकेश मधुकर मढवी यांच्या शेतावर पिक पहाणी कार्यक्रमाचे दि. 9 नोव्हेबर रोजी सकाळी अकरा वाजता नियोजन करण्यात आले होते. यावेळी नागपुरचे अंकुर सिड्स कंपनीचे ऐरिया मॅनेजर दिपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, यावेळी चौल येथील भात बियाणे विक्रेते डि.के. मनोहर, चौलचे साई कृषी सेवा, सागमळा येथील समर्थ कृषी सेवा केंद्र, आंदोशी येथील मनिष कृषी केंद्र, वावे येथील नवजीवन कृषी केंद्र यांच्या उपस्थितीसह शेतकरीवर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
अंकुर सिड्स कंपनीचे एरिया मॅनेजर दिपक पाटील यांनी भाताचे श्री 101 हे वाण पेरणी पासून 135 ते 140 दिवसात तयार होतो, झाड मजबूत व अधिक फुटवे हा वाण देतो, हा वाण पावसात न पडता तग धरून राहतो, दाणे परिपुर्ण भरलेले व अधिक उत्पन्न देणारा, तसेच खाण्यास उत्तम चव असते. अशी माहिती दिली.
या भाताच्या वाणाला रायगड, रत्नागिरी,पालघर येथील शेतकरांची मोठी मागणी असते असे शेवटी सांगण्यात आले.