ताज्याघडामोडी

बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे अलिबाग तालुका प्रमुख प्रफुल्‍लशेठ मोरे

ज्या जनतेने आमदार केले, त्यांचेशी प्रामाणीक
-आम. शहाजी बापू पाटील यांची चौफेर टोलेबाजी

रेवदंडा-महेंद्र खैरे-ज्या जनतेने आमदार केल, त्यांचेशी प्रामाणीक असल्याचे स्पष्ट करून शेकापक्षावर चौफेर टिका आम. शहाजी बापू पाटील यांनी रेवदंडा येथील बाळासाहेबाची शिवसेना पक्षाच्या पक्ष प्रवेश सोहळया प्रंसगी उपस्थितांना संबोधीताना केले.
संपुर्ण महाराष्ट्रात गुवाहाटीतून काय झाडी, काय डोंगर सगळं ओके हाय,,, या मातीच्या भाषेने प्रसिध्दीस आलेले सांगुर्लाचे आम. शहाजीबापू पाटील यांनी रेवदंडा येथील प्रफुल्‍लशेठ मोरे यांच्या बाळासाहेबाची शिवसेना पक्षाच्या पक्ष प्रवेश सोहळया प्रंसगी राजकीय वैचारिक पातळी, राजकीय अभ्यास, राजकीय विव्दता, प्रगल्भता उपस्थितांना दाखवून देताना राजकीय संघर्ष, व शेकापक्षावर चौफेर टिका आदी विषयावर उपस्थितांना हसवत ठेवीत जबरदस्त भाषणशैलीने मंत्रमुग्ध केले. यावेळी सर्वसामान्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व अर्थशास्त्रात प्राविण्य असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आदरभाव व्यक्‍त करून आम. महेंद्रशेठ दळवी यांचे कर्तृत्व,दातृत्व व नेतृत्वाचे कौतुक केले.
रेवदंडा येथील नानानानी पार्क येथे संभाजी बिग्रेडचे माजी जिल्हा अध्यक्ष प्रफुल्‍लशेठ मोरे यांच्या बाळासाहेबाची शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे संपन्न झाला. यावेळी सांगुर्ल्याचे बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे आम. शहाजीबापू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीस आम. महेंद्रशेठ दळवी, जिल्हा प्रमुख राजा केणी,जिल्हा संघटक मयुरेश गंभीर, कामगार नेते दिपक रानवडे, जिल्हा महिला संघटक शुभांगी करडे, माजी जि.प.सदस्य बाळासाहेब तेलगे, जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे,शिवराज्यबिग्रेडचे जिल्हा अध्यक्ष शैलेश चव्हाण, मुरूड तालुका प्रमुख ॠषीकांत डोंगरीकर, निलेश घाटवळ, रोहा तालुका प्रमुख अ‍ॅड मनोज शिंदे, उद्देश वाडकर,भगिरथ पाटील, मुरूड-अलिबाग महिला संघटक शिला कडू, अलिबाग तालुका महिला संघटक स्मिता चव्हाण, प्रफुल्‍लशेठ मोरे, भारती मोरे आदीसह शिवसेना बाळासाहेब पक्षातील अलिबाग, मुरूड व रोहा तालुक्यातील पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते. यावेळी मोठया संख्येने बाळासाहेबाची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व प्रफुल्‍ल मोरे समर्थक कार्यकर्ते मित्रमंडळ, व सगेसोयरे यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवराचे हस्ते दिपप्रज्वलन व शिवप्रतिमेस पुष्पमालिका अर्पण कार्यक्रम घेण्यात आला, त्यानंतर प्रमुख अतिथी आम. शहाजी बापू पाटील यांचा सत्कार आम. महेंद्रशेठ दळवी तसेच प्रफुल्‍लशेठ मोरे यांनी केला. इतर मान्यवर उपस्थितांचे स्वागत शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आले. यावेळी प्रफुल्‍लशेठ मोरे व भारतीताई मोरे यांनी बाळासाहेबाची शिवसेना या पक्षात पक्षप्रवेश केला त्यांचे स्वागत आम. शहाजी बापु पाटील व आम. महेंद्रशेठ दळवी यांनी शाल,श्रीफळ व पुष्पहार प्रदान करून केले तसेच प्रफुल्‍लशेठ मोरे यांना बाळासाहेबाची शिवसेना या पक्षाची अलिबाग तालुका प्रमुख पदाचे नियुक्‍तीपत्र आम. शहाजी बापु पाटील व आम. महेंद्रशेठ दळवी यांचे हस्ते देण्यात आले.
प्रारंभी कामगार नेते दिपक रानवडे यांनी उपस्थितांना संबोधीत करताना आम. महेंद्रशेठ दळवी चतुरस्त्र नेते असल्याचे उदाहरणासह सांगितले तर बाळासाहेब तेलगेे यांनी भाषणात शेकापक्षावर चौफेर टिका केली. तर आम. महेंद्रशेठ दळवी यांनी सर्वसामान्यात मिसळणारा कार्यकर्ता अशी ओळख प्रफुल्‍लशेठ मोरे यांची करून देताना, अलिबाग तालुका प्रमुख म्हणून त्याचेवर सोपवलेली जबाबदारी योग्य असल्याचे म्हटले.
प्रमुख अतिथी आम. शहाजी बापू पाटील यांनी प्रारंभीच पत्‍तीस हजार मताधिक्याने निवडून येणारा आम. महेंद्रशेठ दळवी यांच्या कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्वाला सलाम असे गौरवोद‍्गार काढले, यावेळी बोलताना त्यांनी म्हटले,मतदारांनी शिवसेना व भाजप युतीला सत्‍तेसाठी निवडून दिले होते, परंतू त्यांना निवडणूकीत पाडले, हरविले त्यांचे सोबत बसावे लागले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे झाले, यासाठी सर्व मान्य केले . मात्र मतदार संघातील विकासात निधी दिला जात नव्हता, अश्या वेळी निवडून दिलेल्या जनतेसाठी काय करता येत नव्हते, अखेर एकनाथ शिंदे यांना काहीतरी करा असा आग्रह धरला होता, त्यामुळे चाळीस आमदाराच्या आग्रहाखातील एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीचा रस्ता पकडला असे सांगितले तसेच कष्टकरी व शेतकरी वर्गाने निवडून दिले आहे, निवडुन दिलेल्या जनतेशी प्रामाणीक राहिलो हे स्पष्ट केले. यावेळी शेकापक्षावर चौफर टिका करताना शेकापक्ष हा हुकूमशाही व दडपशाही करणारा पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला, प्रत्येक वर्षी तिन मोर्चे काढायचे हेच सुत्र शेकापक्षाचे आहे. आता मात्र शेकापक्षाला परतीचा प्रवास असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री हे सर्वसामान्यातील मुख्यमंत्री असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी अर्थशास्त्रात प्राविण्य मिळविले आहे, सध्याचे सरकार स्थिर असून पुढील काळात विकासाचे अनेक कामे मार्गी लागलेली असतील असे म्हटले. कार्यक्रमाचे शेवटी आम. महेंद्रशेठ दळवी व प्रफुल्‍लशेठ मोरे व बाळासाहेबाची शिवसेनेचे वतीने भिंतीचित्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *