सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे…चित्रलेखा पाटील यांच्या स्तुत्य उपक्रमाने
काकळघर पिएनपी शाळेतील विदयार्थीनीची सायकल सवारी
खुप शिका, मोठे व्हा पण शाळा व गावाला विसरू नका-चित्रलेखा पाटील यांच्या संदेश
रेवदंडा-महेंद्र खैरे- सायकल वाटप उपकार म्हणून न करता, कर्त्यव्य म्हणून करत आहे, कितीही मोठे व्हा, पण गरीब व कष्टकरी जनतेस विसरू नका हा आम. भाई जयंत पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनाने ही वाटचाल सुरू आहे. विदयार्थीनींनो खुप शिका, मोठे व्हा पण शाळा व गावाला विसरू नका,, अशीच एक सायकल रूपी मदत पुढे कोणाला तरी निश्चित करा असा संदेश शेकापक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी काकळघर पिएनपी शाळेतील विदयार्थ्यीनीना सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या स्तुत्य उपक्रमात विदयार्थीनीना सायकल वाटप कार्यक्रमात मार्गदर्शन करताना म्हटले.

मुरूड तालुक्यातील काकळघर पिएनपी शाळेत विदयार्थीनीना सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या स्तुत्य उपक्रमाने काकळघर पिएनपी शाळेच्या विदयार्थीनींना सायकल वाटप कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. प्रसंगी सावित्रीच्या लेकी चालल्या पुढे या स्तुत्य उपक्रमाच्या सर्वोसुवा शेकापक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीसह शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस मंडळ सहचिटणीस मनोज भगत, अलिबाग व मुरूड विधानसभा मतदार अध्यक्ष संदिपभाई घरत, शेकापक्ष मुरूड तालुका चिटणीस अजीत कासार, शेकापक्षाचे मुरूड तालुका सहचिटणीस सि.एम. ठाकूर, मुरूड पं.स.माजी सभापती रमेश नागावकर, शेकापक्षाचे पुरोगामी युवक अध्यक्ष शरद चवरकर, सरपंच उसरोली ग्रा.प. मनिष नांदगावकर, काकळघर ग्रा.प. माजी सरपंच संतोष कांबळी, बोर्ली ग्रा.प.उपसरपंच मतिन सौदागर, शशिकांत पारवे, सुभाष पारवे, तुकाराम पाटील, सोनाली ठाकूर, सिताराम ठाकूर, मधुकर पाटील, विनायक चोगले, स्वस्तिक ठाकूर, सुरेश नांदगावकर आदी मुरूड तालुका शेकापक्ष कार्यकर्ते तसेच पिएनपी शाळा काकळघर मुख्याध्यापक गजे्र मॅडम व शिक्षकवर्ग उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवर उपस्थितांचे हस्ते दिपप्रज्वलन व सरस्पती पुजनाने झाली, तद्नंतर पिएनपी शाळेच्या विदयार्थ्यानी इशस्तवन, स्वागतगीत गायन केले.यावेळी मुरूड तालुका व काकळघर शेकापक्षाचे वतीने माजी सरपंच संतोष कांबळी यांनी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी चित्रलेखा पाटील यांचे स्वागत व सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून केले. यावेळी उपस्थित शेकापक्षाचे मुरूड तालुका पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यांचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. तसेच काकळघर पिएनपी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक गजे्र मॅडम व शिक्षकवृंद यांनी पिएनपी कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून केला.
यावेळी सुरेश नांदगावकर यांनी प्रास्ताविकेत शेकापक्षाच्या कै. नारायण नागू पाटील, कै. दत्ता पाटील, कै. प्रभाकर पाटील, आम. जयंतभाई पाटील, माजी आम. पंडितशेठ पाटील, माजी आम. मिनाक्षीताई पाटील व यांचेसह चित्रलेखा पाटील यांच्या कार्याची माहिती दिली.तसेच यावेळी शशिकांत पारवे, तुकाराम पाटील, सोनाली ठाकूर, अजीत कासार, मनोज भगत यांनी उपस्थित विदयार्थीवर्ग व पालकवर्ग यांना संबोधीत केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुभाष ठाकूर यांनी केले.
त्यानंतर प्रमुख अतिथी चित्रलेखा पाटील व शेकापक्षाचे उपस्थित मान्यवर मंडळी यांचे हस्ते काकळघर पिएनपी शाळेच्या विदयार्थीनीना सायकलचे वाटप करण्यात आले.