नांगरवाडीत शेकापक्षाला दे धक्का
बाळासाहेबाची शिवसेनेत (शिंदे गट) पन्नास ग्रामस्थांचा पक्ष प्रवेश
आम. महेंद्रशेठ दळवी यांनी केले स्वागत
रेवदंडा-महेंद्र खैरे- अलिबाग आम. महेंद्रशेठ दळवी यांच्या निवासस्थानी राजमळा येथे नांगरवाडी येथील पन्नास ग्रामस्थांनी आम. महेंद्रशेठ दळवी यांच्या कार्यावर विश्वास ठेवून बाळासाहेबाची शिवसेना (शिंदे गट) या पक्षात नुकताच पक्षप्रवेश केला, आम महेंद्रशेठ दळवी यांनी त्यांचे शाल परिधान करून व पुष्पगूच्छ प्रदान करून स्वागत केले.
अलिबाग तालुक्यातील रामराज ग्रामपंचायत अंतर्गत नांगरवाडी गाव शेकापक्षाचा बालेकिल्ला म्हण्ाून ओळखला जातो, या शेकापक्षाच्या बालेकिल्लाला आम. महेंद्रशेठ दळवी यांनी सुरूंग लावला, अलिबाग येथील आम. महेंद्रशेठ दळवी यांचे राजमळा निवासस्थानी कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला,नांगरवाडी येथील किशोर पाटील यांचे नेतृत्वाखाली अँड महेश शिंदे यांचे सहकार्याने नांगरवाडीतील पन्नास कार्यकर्त्यानी शेकापक्षाला सोडचिठ्ठी देऊन बाळासाहेबाची शिवसेना (शिंदे गट) या पक्षात प्रवेश घेतला, आम महेंद्रशेठ दळवी यांनी त्यांचे शाल परिधान करून व पुष्पगूच्छ प्रदान करून स्वागत केले.

या पक्षप्रवेश सोहळयांस माजी जि.प.सदस्य, माजी पं.स.सभापती बाळासाहेब तेलंगे,जिल्हा नियोजन समिती सदस्य संतोष निगडे, उपतालुका प्रमुख संदेश पालकर, जिल्हा युवा समन्वयक अधिकारी अजय गायकर, विभाग प्रमुख पुथ्वीराज पाटील, उपविभाग प्रमुख अँड महेश शिंदे, अरूण भगत, जनार्दन भगत, लक्ष्मण भोईर, मनोज दासगावकर, प्रविण शिंदे, उल्हास चाचड, जयप्रकाश पवार,़़़ज़ीवन पाटील आदीची उपस्थिती या पक्ष प्रवेश कार्यक्रमास होती.
रामराज ग्रा.प.हद्दीत बाळासाहेबाची शिवसेना-शिंदे गटात प्रवेश केलेले युवा नेतृत्व किशोर पाटील हे क्रियाशील व्यक्तीमत्व असून, परिसरात विविध कार्यक्रमात सुत्रसंचलन उत्कृष्टरित्या करतात, त्यांच्या पक्ष प्रवेशाने शिवसेना-शिंदे गटाची ताकद वाढेल, विशेषतः युवावर्ग निश्चितपणे शिवसेना-शिंदे गटाकडे प्रवेश करतील असा आशावाद व्यक्त केला जातोय.