अलीबागताज्याघडामोडी

जे .एस्. डब्ल्यू फाउंडेशन व मॅजिक बस यांच्या तर्फे सालाव येथे दिवाळी कॅम्प संपन्न.

अलिबाग व मुरुड तालुक्यातील कोर्लई, बोर्ली, वळके, थेरोंडा, वाघूळवाडी येथे गाव पातळीवर दि .21.10.2022 ते 28.10.2022रोजी जे. एस्. डब्ल्यू. ॲस्पायर साळाव प्रोजेक्ट मॅजिक बस मार्फत दिवाळी कॅम्प आयोजित करण्यात आला होता . या कार्यक्रमात जे. एस. डब्ल्यू. सी.एस.आर. प्रतिनीधी श्री राम मोहिते, श्री राकेश चवरकर, मॅजिक बस प्रतिनिधी डॉ प्रगती पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
या कॅम्प मध्ये मुलांना शारीरिक आणि मानसिक आरोग्य व 10 विचार नंतरच्या शिक्षणाच्या संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कॅम्प अंतर्गत बौद्धिक खेळ, आर्ट व क्राफ्ट कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
या कार्यक्रमात एकूण पाच गावामधून सुमारे 300 हुन अधिक मुलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन आपल्या अंगभूत कलागुणांचे प्रदर्शन केले . या कॅम्पमधून मुलांना सांघिक कार्य , सह – अध्ययन , शैक्षणिक विकास , सादरीकरण अशा जीवन कौशल्यांचे मार्गदर्शन करण्यात आले . कार्यक्रमात पालक व इतर ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मॅजिक बसच्या समन्वयक डॉ प्रगती पाटील आणि स्टाफ शीतल गायकर, पूजा ठाकूर, वर्षा ठाकूर, धनश्री पेणकर, अंकिता, रुचिरा, वर्षा या सगळ्यानी अथक मेहनत घेतली . कार्यक्रमाचा शेवट शैक्षणिक वस्तू आणि खाऊ वाटप करुन करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *