ताज्याघडामोडी

रेवदंडा येथे श्री सत्यसाई बाबाच्या दिव्य रथाचे भक्‍तीमय वातावरणात जल्‍लोषात स्वागत

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 42;
रेवदंडा येथे श्री सत्यसाई बाबाच्या दिव्य रथाचे भक्‍तीमय वातावरणात जल्‍लोषात स्वागत
रेवदंडा-महेंद्र खैरे-रेवदंडा येथे श्री सत्यसाई बाबाच्या दिव्य रथाचे भक्‍तीमय वातावरणात जल्‍लोषाने स्वागत करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने भक्‍त मंडळीने दिव्य रथातील श्री सत्यसाईबाबाच्या पादुकांचा दर्शनाचा लाभ घेतला.
साई भक्‍त सुरेश मेहरे यांचे मार्गदर्शन व नियोजनाखाली रेवदंडा मोठे बंदर येथे श्री सत्यसाई बाबाच्या दिव्य रथाचे स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. यावेळी सायकांळी चार वाजता नाशिक बाज्या, ढोल पथक तसेच फटाक्याच्या आतषबाजीने श्री सत्यसाई बाबाच्या दिव्य रथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने रेवदंडा, थेरोंडा परिसरातील श्री सत्यसाई भक्‍त मंडळीची उपस्थिती होती. रेवदंडा ग्रामपंचायत सरपंच प्रफुल्‍ल मोरे, भारती मोरे, माजी सरपंच गोंधळी यांनी प्रारंभी श्री सत्यसाई बाबाच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला. युगाअवतार श्री सत्यसाई बाबा आंध्र प्रदेश राज्यातील पुट्टपर्थी यांच्या जन्मशताब्दी निमित्‍ताने जगभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाचा एक भाग म्हणून श्री सत्यसाई बाबाच्या पादुका असलेले सहा दिव्य रथ सर्व भारता मध्ये दर्शनासाठी व विश्‍व शांती साठी निघालेले आहेत. त्यातील एक रथ गोवा राज्यात भ्रमण करून रत्नागिरी जिल्हातून महाड-रोहा मार्गे रायगड जिल्हात शनिवार दि. 7 जुन रोजी रेवदंडा आगरकोट किल्‍ला सितारा स्टँड जवळ आगमन सायकांळी पाच वाजता झाले.
त्यानंतर रेवदंडा बाजारपेठे मार्गे थेरोंडा,नागाव, अलिबाग करीता प्रस्थान झाले. या रथाचे भव्य स्वागत करून श्री सत्यसाई बाबाच्या पादुकांचा दर्शनाचा व प्रसादाचा लाभ मोठया संख्येने श्री सत्यसाई भक्‍त मंडळीने घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *