वाडगाव मध्ये दिपोत्सव व संगित मैफिल
ॠषीकांत भगत यांची संंकल्पनेला ग्रामस्थांचा सहभाग
रेवदंडा-महेंद्र खैरे- वाडगाव येथे दिपावलीच्या लक्ष्मीपुजनाचे निमित्ताने दिपोत्सव व संगित मैफिल कार्यक्रम घेण्यात आला, ॠषीकांत भगत यांच्या संकल्पनेला वाडगाव ग्रामस्थांनी सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद व्दिगूणीत केला.
अलिबाग नजीकच्या वाडगाव येथे ॠषीकांत भगत मित्रमंडळ, अभिनव मित्रमंडळ,व ग्रामस्थ वाडगाव यांच्या सहभागाने साडेसातचे सुमारास दिपोत्सव कार्यक्रमाचे नियोजन केले होते, यावेळी वाडगाव मधील ग्रामस्थ, महीलावर्ग व युवावर्ग यांनी सहभागी होऊन वाडगाव गावाचे आराध्य दैवत श्री मारूती मंदिराचे सभोवताली एक हजार दिप उजळले, तसेच फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.
तसेच रात्री साडेनऊ वाजता संगित मैफिलचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये उस्ताद राशिद खान यांचे शार्गिद आडगावकर यांचे सुमधूर भजन संध्येचा तसेच गायनाची रसिक प्रेक्षकांना मेजवानी मिळाली, यावेळी रोहन पंढरपुरकर यांनी तबला, स्वानंद कुलकर्णी यांनी हार्मोनियम, सिध्देश उडाळकर यांनी पंखवाजाने साथ दिली. या संगित मैफिलसाठी सर्व स्तरातील मान्यवर मंडळीची उपस्थितीसह वाडगाव ग्रामस्थांची उपस्थिती होती.
दिपोत्सवाचे निमित्ताने वाडगाव मधील ग्रामस्थ, महिला व युवावर्ग मोठया संख्येने सामील होऊन एकत्रीतपणे दिपावली सणाचा आनंद घेतला, एक आगळा वेगळा कार्यक्रम यशस्वीपणे साजरा करण्याची संकल्पनेची पुर्तता झाली असे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक व वाडगावचे ग्रामस्थ ॠषीकांत भगत यांनी म्हटले.