साळाव पुल व परिसरात ड्रोनने प्रिं-वेंडीग शुंटीग -गुन्हा दाखल
साळाव पुल व परिसरात ड्रोनने प्रिं-वेंडीग शुंटीग -गुन्हा दाखल
रेवदंडा-महेंद्र खैरे-रायगड जिल्हाधिकारी यांचे मनाई हुकूम असल्याने सदर मनाई आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी प्रि-वेंडींग च्या निमित्ताने साळाव पुल व परिसरात ड्रोनने चित्रीकरण करणार्याचे विरोधात रेवदंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रेवदंडा हा निसर्ग सोदर्य परिसर असून येथील समुद्र किनारा व परिसर निसर्गाने नटलेला आहे. त्यामुळे प्रि-वेंडींग शुटींग साठी फोटोग्राफर्सना खास आकर्षण या परिसराचे आहे. मात्र सध्या भारत-पाक युध्दजन्य परिस्थिती व रायगड जिल्हाधिकारी यांचे मनाई हुकूम असल्याने प्रि-वेंडीग वर्गेरे साठी या परिसरात ड्रोन चित्रीकरणास परिसरात बंदी आहे. याबाबत अनेकदा अति उत्साही तरूण व तरूणी ड्रोन व्दारे चित्रीकरण करताना दिसून येतात. अखेर रेवदंडा पोलिस ठाणे इन्चार्ज स.पो.नि. श्रीकांत किरविले यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
साळाव पुलावर दि. 17 मे 2025 रोजी सकाळी 7.30 चे सुमारास कुलदीप गजेंद्र उपाध्याय वय 25 वर्षे रा.पुष्कराज अपार्टमेंट गांधीचौक बदलापुर जि. ठाणे यांनी लग्नाचे शुंटीग करण्याचे उद्देशाने साळाव पुलापासून समद्र किनारा परिसर चित्रीकरण करण्याचे हेतूने ड्रोन विनापरवाना उडवून, जिल्हाधिकारी रायगड यांचा आदेशाचे उल्लंघन करताना रेवदंडा पोलिसांना आढळून आला. याबाबत रेवदंडा पोलिस ठाणे पोलिस शिपाई जितेंद्र रामचंद्र मगर यांनी त्यांचे विरोधात रेवदंडा पोलिस ठाणे येथे फिर्याद नोंदविली. त्यानुसार रेवदंडा पोलिस ठणे येथे रजि. न. 68/2025 भा.न्या.स. 2023 कलम 223 (ब) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सध्यस्थिती मध्ये सागरी किनारा भाग सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असून कोणी ड्रोनचा वापर करताना आढळून आल्यास,कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन रेवदंडा पोलिस ठाणे इन्चार्ज सपोनि श्रीकां किरविले यांनी केले आहे. शिवाय सागरी किनारा भाग सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने ड्रोनव्दारे चित्रीकरण करण्याचे जिल्हाधिकारी रायगड यांचे मनाई आदेश लागू आहे.